भाजपात गेलेल्या आमदारांना पुन्हा पक्षात आणण्यासाठी राष्ट्रवादीचा प्लॅन तयार…..!

भाजपात गेलेल्या आमदारांना पुन्हा पक्षात आणण्यासाठी राष्ट्रवादीचा प्लॅन तयार…..!

२०१९ विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीच्या अनेक आमदारांनी पक्षांतर करून भाजपा पक्षात जाहीर प्रवेश केला होता. मात्र विधानसभा निवडणुकीच्यानंतर राज्यात राजकीय घडामोडी घडून तीन पक्षाचे आघाडी सरकार स्थापन झाले होते. त्यात पुन्हा एकदा राष्ट्र्वादीने भाजपात गेलेले आपले आमदार पुन्हा पक्षात आणण्यासाठी कंबर कसली आहे.

त्यातच विरोधी पक्षाने आघाडी सरकारचे आमदार आमच्या पक्षाच्या संपर्कात आहे अशी चर्चा सुरु केली होती. हे विधान अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी खोडून काढत भाजपा पक्षाचे आमदारच आमच्या संपर्कात असल्याचे बोलून दाखवले होते. तसेच भाजपमध्ये गेलेले आमदार पुन्हा राष्ट्रवादीत येण्यासाठी आतूर असल्याचं त्यांनी म्हटले होते

भाजपमध्ये गेलेल्यांना परत आणण्यासाठी राष्ट्रवादीने व्यूहरचना आखली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यात झालेल्या बैठकीत याबाबत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. प्रत्येक जिल्ह्यातील तीनही पक्षाचं राजकारण, पक्षाची ताकद पाहून गयारामांना पुन्हा प्रवेश दिला जाणार आहे. ही जबाबदारी मंत्री अजित पवार आणि मंत्री जयंत पाटील यांच्यावर सोपवण्यात आलेली आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: