खडसेंपाठोपाठ पश्चिम महाराष्ट्रातील हा नेता करणार राष्ट्रवादी मध्ये प्रवेश

मुंबई – भाजपला रामराम ठोकून माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) प्रवेश केला. एकनाथ खडसे हे भाजपचे ज्येष्ठ आणि जुने नेते होते. खडसेंनी भाजपची साथ सोडल्यानंतर राष्ट्रवादीत भरती सुरूच आहे.  


कोल्हापुरातील हातकणंगले विधानसभा मतदारसंघातून जनसुराज्य पक्षाचे नेते आणि माजी आमदार राजीव आवळे हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. राजीव आवळेंच्या पक्षप्रवेशानंतर हातकणंगले मतदारसंघात राष्ट्रवादीला आणखी बळ मिळणार आहे.

एकनाथ खडसेंनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर त्याच्या पाठोपाठ माजी चार आमदारांचे तेवढ्याचं आनंदात स्वागत करण्यात आलं आहे. तसेच मागील दोन महिन्यांत पाच माजी आमदारांनी हातात घड्याळ बांधलं आहे. यामुळे राष्ट्रवादीला चांगले बळ निर्माण झाले आहे.

या माजी आमदारांनी केला राष्ट्रवादीत प्रवेश
१) एकनाथ खडसे – भाजप
२) सदाशिव पाटील – काँग्रेस
३) उदेसिंग पाडवी – भाजप
४) सीताराम घनदाट – अपक्ष
५) रमेश कदम – राष्ट्रवादी-शेकाप-भाजप-काँग्रेस–राष्ट्रवादी अशी घरवापसी केली आहे.
६) राजीव आवळे – ( जनसुराज्य पक्ष नेते) यांचा राष्ट्रवादी प्रवेश जवळपास निश्चित झाला आहे.

दरम्यान, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत प्रवीण सिंह पाटील मुरुगुडमध्ये मेळावा घेणार आहेत. यावेळी माजी आमदार राजीव आवळे हे शेकडो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत.

ग्लोबल न्युज नेटवर्क: