“दिनो मोरिया हा मुंबई मनपाचा सचिन वाझे; सखोल चौकशी केल्यास अनेक पेंग्विन बाहेर पडतील”

 

अभिनेता दिनो मोरिया याच्यावर सक्तवसुली संचलनालयाने अर्थात ईडीने केलेल्या कारवाईनंतर भारतीय जनता पक्षाचे आमदार नितेश राणे यांनी याचं मुद्द्याला पकडून पुन्हा एकदा मुंबई मनपात सत्तेत असलेल्या शिवसेना पक्षावर जोरदार टीका केली आहे.

दिनो मोरिया हा मुंबई महानगरपालिकेतील सचिन वाझे होता. याप्रकरणात आणखी खोलवर गेल्यास अनेक ‘पेंग्विन’ बाहेर पडतील. आमच्याकडे सगळ्याचे पुरावे आहेत, असा दावा नितेश राणे यांनी केला. आता राणे यांच्या या दाव्यानंतर पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात एकचं खळबळ उडाली आहे.

नितेश राणे यांनी शनिवारी ट्विट करुन यासंदर्भात भाष्य केले. यावेळी त्यांनी दिनो मोरिया प्रकरणावरुन शिवसेनेवर निशाणा साधला आहे. बॉलिवूडमध्ये चार-पाच चित्रपट करण्यापलीकडे दिनो मोरियाची विशेष ओळख नाही. मात्र, हा दिनो मोरिया मुंबई महानगरपालिकेशी संबंधित कोणतेही काम चुटकीसरशी करुन देऊ, असे इतरांना सांगत फिरतो. दिनो मोरियाची कोणाशी मैत्री आहे?, असा सवाल नितेश यांनी उपस्थित केला.

Team Global News Marathi: