पूरपरिस्थितीचा राजकीय आखाडा करु नका, संजय राऊत यांनी पुन्हा विरोधकांना झापले !

 

मुंबई | राज्यात मुसळधार पावसामुळे कोकणात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गात आणि कोल्हापुरात महापूर आल्यासारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे. चिपळूणला चारही बाजूने पाण्याने वेढा घातल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर कोल्हापुरात पंचगंगा नदीची पाण्याची पातळी वाढून पुणे बंगलोर हायवे बंद झाला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं सामनातून मोदींनी महाराष्ट्राला मदत करण्याचे आवाहन केलं आहे.

‘केंद्राच्या तिजोरीत सर्वाधिक पैसा टाकणाऱ्या महाराष्ट्राचे संकट हे देशावरचं संकट मानून मोदी सरकारने महाराष्ट्राला सढळ हस्ते मदत करावी, ही मराठी जनतेची अपेक्षा आहे. एकंदरीत महाराष्ट्रावर अस्मानी संकट पुन्हा एकदा कोसळले असून या पूरपरिस्थितीचा राजकीय आखाडा कोणी करू नये. सरकार काय करतंय? इतका पाऊस पडत असताना सरकार झोपलं होतं काय? सरकारची मदत का पोहोचली नाही?, असे प्रश्न कोणाला विचारायचेच असतील तर थोडी कळ काढावी,’ असं म्हणत शिवसेनेनं विरोधकांना सुनावलं आहे.

पुढे अग्रलेखात लिहिले आहे की, आज परिस्थिती अशी आहे की, ठिकठिकाणी जनजीवन बंद पडलं. रस्ते वाहतूक खड्डय़ात गेली आहे. लहान पूल, साकव प्रवाहात उखडून गेले आहेत. पावसाचे फक्त झोडपणे आणि दडपणेच चालले आहे. गावागावांत आक्रोश आणि किंकाळय़ाच ऐकू येत आहेत. हे सर्व केंद्र सरकारलाही गांभीर्यानेच घ्यावे लागेल,’ असं शिवसेना म्हणाली आहे.

Team Global News Marathi: