चिपळूणमध्ये झालेल्या पूरग्रस्तांना केंद्र सरकारकडून मदत मिळेल’

 

चिपळूणमध्ये पावसाने पूर परिस्थिती निर्माण झाली असून लोकांच्या घरात पाणी शिरलं आहे. वाढत्या पाण्याच्या प्रभावामुळे वीज सेवा खंडित करण्यात आली आहे. वीज नाही, पाणी नाही, अशी अवस्था येथील नागरिकांची झाली आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना पिण्याचे पाणी आणि अन्नाची पाकिेट तातडीने पुरवण्याची मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन करून ही मागणी केली आहे.

राजकारणात हेवेदावे तर असतातच परंतु संकटकाळी सगळेच एकत्र येतात. याचंच उदाहरण म्हणजे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोनवरून केंद्र कडून पूर्ण सहकार्य केलं जाईल अशी माहिती दिली आहे. पिण्याचे पाणी आणि तयार अन्नाची पाकिटे ही आताच्या घडीला तातडीची गरज आहे. असे त्यांनी बोलून दाखविले.

या स्थितीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी मी चर्चा करून पिण्याचे पाणी आणि अन्न पाकिटे पुरवण्यासाठी तातडीने लक्ष देण्याची विनंती केली आहे. त्यांनी सरकार ते तत्काळ उपलब्ध करून देईल, असे सांगितले आहे. यात सरकारला आमचे संपूर्ण सहकार्य असेल, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. काही ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. यात ज्यांचे प्राण गेले त्यांच्या कुटुंबीयांसोबत आम्ही आहोत, असंही त्यांनी सांगितलं आहे.

 

Team Global News Marathi: