“फ्लेचर पटेल हा समीर वानखेडे यांचा फॅमिली फ्रेंड आहे” पुन्हा नवाब मलिक यांचा खळबळजनक खुलासा गंभीर

 

मुंबई | राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि एनसीबीचे अधिकारी समीर वानखडे यांच्यावर पुन्हा एकदा केलेल्या कारवाई विरोधात संशय व्यक्त केला आहे. एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे आणि फ्लेचर पटेलशी संबंध काय आहे? तीन केसेसमध्ये फ्लेचर पटेल पंच कसे? फॅमिली फ्रेंडला पंच म्हणून घेण्यामागचा वानखेडेंचा हेतू काय? असे सवाल राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे.

नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन एनसीबीवर पुन्हा एकदा तोफ डागली आहे. फ्लेचर पटेल हा समीर वानखेडे यांचा फॅमिली फ्रेंड आहे. ते वानखेडेंच्या पब्लिसिटीसाठी कार्यक्रम आयोजित करत असतात. त्यांचे फोटोही मी ट्विटरवर टाकले आहेत. साधारणपणे एखादा गुन्हा घडतो तेव्हा आजबाजूच्या लोकांना बोलावून पंचनामा केला जातो. माझ्याकडे पंचनाम्याचे फोटो आहेत. फ्लेचर पटेलने कोणते कार्यक्रम आयोजित केले ते फोटो ट्विटरवर टाकले आहेत. माय सिस्टर लेडी डॉन त्यांचेही फोटो टाकले आहेत, असं मलिक म्हणाले.

मी गेल्या वर्षभरातील एनसीबीच्या केसेसची माहिती घेतली. त्यात तीन केसेसची माहिती संदिग्ध वाटली. सीआर नंबर 38/20 सर्च ऑपरेशन करण्यात आलं. २५ नोव्हेंबर २०२०मध्ये छापा मारला. त्यात फ्लेचर पटेल पंच करण्यात आले. त्यानंतर सीआर नंबर 16/ 20मध्ये 9 डिसेंबर 2020 रोजी सर्च ऑपरेशन करण्यात आलं. त्यात फ्लेचर पटेल पंच आहे. तिसरी केस आहे सीआर नंबर 2/21 आहे. त्यानुसार 2 जानेवारी 21 ला छापेमारी करण्यात आली. त्यातही फ्लेचर पटेल पंच आहेत. फ्लेचर पटेल इंडिपेंडंट पंच आहेत असं सांगता मग ते तुमचे फॅमिल फ्रेंड कसे? पंचनाम्यासाठी जवळच्या लोकांना घेता. याचा अर्थ ही कारवाई ठरवून केली का? असा सवाल त्यांनी केला.

सीआरपीसी कायद्यात एकच पंच वारंवार घेतला जात असेल तर केसेसमध्ये दम नसतो अनेकदा हे कोर्टाने सांगितलं आहे. या तीन केसेसमध्ये फ्लेचर पटेल पंच कसे झाले यांचं उत्तर वानखेडेंनी द्यावं? तसेच या सर्व प्रकरणाशी लेडी डॉनचा काय संबंध आहे? ही लेडी डॉन कोण आहे? हे रॅकेट काय आहे? लेडी डॉनच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये दहशत निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे का?, असा सवाल त्यांनी केला.

Team Global News Marathi: