आजही पेट्रोल-डिझेलच्या किंमतींमध्ये वाढ, सर्व सामान्य नागरिकांना बसणार झळ

 

नवी दिल्ली | एकीकडे कोरोनाच्या संसर्गामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेलेल्या असताना दुसरीकडे पेट्रोल-डिझेलच्या किंमतींमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये वाढ करण्यात आली आहे. सरकारी तेल कंपन्यांनी आज शनिवारी देखील सामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री लावली आहे. आजदेखील इंधनांच्या दरांमध्ये वाढ करण्यात आली आहे.

आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये ३०-३५ पैसे प्रति लीटरची वाढ करण्यात आली आहे. यानंतर राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचे दर प्रती लीटर १०५.१४ रुपये तर डिझेलचे भाव ९३.८७ रुपये झाले आहेत. याशिवाय मुंबईमध्ये आज पेट्रोल ३४ पैश्यांनी वाढलं आहे. तर डिझेलचे भाव ३७ पैश्यांनी वाढले आहेत.
या महिन्यामध्ये इंधनाचे दर जवळपास दररोजच वाढले आहेत. ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीच्या १० दिवसांतच पेट्रोलचे दर २.८० रुपयांनी वाढले आहेत तर डिझेलचे दर ३.३० रुपयांनी वाढले आहेत.

आजमध्यप्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगना, कर्नाटक, ओडीसा, जम्मू आणि काश्मीर आणि लडाखमध्ये पेट्रोलचे भाव १०० रुपयांच्या पार गेले आहेत. मुंबईमध्ये पेट्रोलचे भाव सर्वाधिक आहेत. त्यामुळे वाढत्या दरवाढी विरोधात विरोधक काय आक्रमक भूमिका घेतायत हे पाहावे लागणार आहे.

Team Global News Marathi: