सीरमच्या इमारतीला लागलेल्या आगीत पाच जणांचा मृत्यू

सीरमच्या इमारतीला लागलेल्या आगीत पाच जणांचा मृत्यू

ग्लोबल न्यूज: पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या प्लँटमध्ये लागलेल्या आगीची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तत्काळ दखल घेऊन पुण्यातील यंत्रणेला आग आटोक्यात आणण्यासाठी उपाययोजना राबविण्याचे निर्देश दिले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आगीच्या या दुर्घटनेची विभागीय आयुक्त तसेच मनपा आयुक्तांकडून माहिती घेतानाच आग आटोक्यात आणण्यासाठी आणि आवश्यकता भासल्यास मदत व अनुषंगिक आपत्कालीन उपाययोजना राबविण्यात याव्यात निर्देश दिले. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान वेळेत पोहचले आहेत. त्यांनी सुरू केलेल्या शर्थीच्या प्रयत्नांबाबत समाधान व्यक्त केले आहे.

सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या प्लँटला लागलेल्या आगीचे वृत्त समजताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील संसद सदस्यांच्या समवेत सुरू असलेल्या बैठकीतूनच या घटनेची दखल घेतली व तातडीने कृती करण्याच्या सूचना दिल्या.

मात्र आता एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. इमारतीत पाच जणांचा मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. आग लागलेल्या इमारतीमध्ये पाच मृतदेह सापडलेत, अशी माहिती जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी दिल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे.

आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी आज पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली आहे. कोव्हिशील्ड लसीची बिल्डिंग आगीच्या स्थळापासून लांब आहे, त्यामुळे कोव्हिशिल्डच्या लसीला कोणतंही नुकसान झालेलं नाही. पोलिसांची चौकशी सुरू आहे. फायर ऑडिट करण्यात येणार आहे. तसेच या सर्व प्रकरणाचा तपास करण्यात येणार असल्याचं अजित पवार आणि गृहमंत्र्यांनी सांगितलं. तसेच मुख्यमंत्र्यांनीही या सर्व प्रकाराची माहिती घेऊन गंभीर दखल घेतलेली आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: