पहिल्या पत्नीला समीर वानखेडेंची धमकी; नवाब मलिकांचा दावा

 

मुंबई | राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक आणि एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यातील शीतयुद्ध संपण्याचे काही नाव घेत नाहीये त्यातच मलिक यांनी वानखेडे यांच्यावर अनके गंभीर आरोप लगावले होते तर दुसरीकडे वानखेडे यांनी या आरोपांवरून कोरठची पायरी चढली आहे. त्यातच समीर वानखेडे यांच्याविरोधात मंत्री नवाब मलिकांनी पत्रकार परिषदांचं सत्र सुरुच ठेवलंय. आजही पत्रकार परिषदेत बोलताना नवाब मलिकांनी समीर वानखेडेंवर आरोप केले आहेत. समीर वानखेडेंविषयीचा आणखी एक दाखला आणि मोठा गौप्यस्फोट मलिकांनी केला आहे. वानखेडेंचा शाळा सोडल्याचा दाखला मलिकांनी सादर केला. त्या दाखल्यामध्ये समीर वानखेडेंचं नाव समीर दाऊत वानखेडे असल्याचा दावा मलिकांनी केला आहे. तसेच चौकशीतून सत्य बाहेर येईल असंही नवाब मलिकांनी स्पष्ट केलंय.

“समीर वानखेडेंचा फर्जीवाडा आता हळूहळू समोर येऊ लागला आहे. शेजारी राहणाऱ्या आयपीएस अधिकाऱ्याशी वानखेडेंचा वाद झाल्यानंतर त्यांच्या मुलाला खोट्या आरोपांखाली फसवण्याचं काम केलं. त्यांनी एनडीपीएस कोर्टात दाखल केलेल्या जामीन अर्जात आयपीएस अधिकाऱ्यानं मागणी केली आहे की, त्या इमारतीतील सीसीटीव्ह तपासून पाहा. त्यांच्या घरी कोणताही छापा पडला नाही. वानखेडे आणि त्यांचे अधिकारी त्या इमारतीच्या आवारात फिरत होते. मुलाला घरातून बोलावून घेतलं आणि बोगस केस करुन ड्रग मिळाल्याचा आरोप त्याच्यावर लावण्यात आला.”, असं स्पष्टीकरण देत पुन्हा एकदा नवाब मलिकांनी समीर वानखेडेंवर गंभीर आरोप लावले आहेत.

पुढे बोलताना नवाब मलिक म्हणाले की, “ज्या मुलीशी लग्न करुन घटस्फोट दिलाय. वाद निर्माण झाल्यानंतर ती मुलगी समोर येऊन समीर वानखेडेंचं सत्य समोर आणेल. या भितीपोटी एका ड्रग पेडलरच्या माध्यमातून त्या मुलीच्या मामेभावाजवळ ड्रग पोहोचवण्यात आलं. त्यानंतर राज्य सरकारची एजन्सीच्या माध्यमातून अटक करण्याचं कटकारस्थान रचलं. आजही तो मुलगा तुरुंगात आहे. त्याला अडकवल्यानंतर त्याला समीर वानखेडे धमकी देत होते. जर माझ्याविरोधात बोलण्यासाठी तुम्ही समोर आले, तर संपूर्ण कुटुंबाला मी तुरुंगात टाकेल. अशी दहशत यांनी निर्माण केली होती.”

 

Team Global News Marathi: