संभाजीराजे माहिती घ्या; आजचे आंदोलन हे भाजप प्रणीत होते का? – अशोक चव्हाण

 

नांदेडमध्ये मराठा क्रांती मोर्चा आयोजित मोर्चाला मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष आणि पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या अनुपस्थितीबाबत खासदार छत्रपती संभाजीराजेंनी नाराजी दर्शवली होती. या नाराजीवर आता मंत्री अशोक चव्हाण यांनी भाष्य केले आहे. तसेच नांदेडमधील आंदोलन भाजपा प्रणित असल्याचा त्यांनी आरोपलागवला आहे.

ते म्हणाले की, खासदार संभाजीराजे छत्रपती मराठा समाजासाठी प्रामाणिकपणे काम करणारे भाजपमधील एकमेव नेते आहेत. त्यांच्याबद्दल मला नितांत आदर आहे. त्यामुळे त्यांनी माझ्यावर केलेल्या वैयक्तिक टिकेला मी उत्तर देणार नाही. मात्र भाजप त्यांचा गैरवापर करतं आहे. नांदेडमधील आंदोलन हे भाजपप्रणीत होतं, याची कदाचित त्यांना कल्पना नसावी. या आंदोलनासाठी भाजपचे कार्यकर्ते गोळा करण्यात आले होते. बहुतांश मराठा संघटना या आंदोलनात सहभागी झाल्या नव्हत्या, असाही आरोप मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे.

चव्हाण म्हणाले की, संसदेत भाजपची असलेली मौन धारण करण्याची असलेली भूमिका आणि संसदेत संभाजीराजेंना बोलू देण्यासाठी विरोधकांकडून करण्यात आलेली मागणी यावर भाजप खासदारांनी काहीही न बोलणे. संसदेतही भाजपकडून आरक्षणाबाबत काहीच प्रतिक्रिया देण्यात आली नाही. हे संभाजीराजेंना माहिती नसेल. संभाजीराजेंचा वापर करून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे हि दुर्देवाची गोष्ट आहे. त्यांची सध्या दिशाभूल करण्याचे काम केले जात असल्याचे यावेळी चव्हाण यांनी म्हंटले आहे.

Team Global News Marathi: