हस्तरेषांवरून जाणून घ्या प्रेमात यश मिळेल की नाही

प्रेमात पडलेल्या प्रत्येक तरुण-तरुणीला आपण लग्नबंधनात अडकावं असं वाटत असतं. अनेकांचं हे स्वप्न पूर्ण होतं तर अनेकांचा प्रेमभंग होतो. आपण प्रेमात पडला असाल तर आपल्या प्रेमाचं भविष्य काय आणि कसं असेल? याचा विचार आपल्या मनात आला तर जाणून घ्या याचं उत्तर देऊ शकतात त्या आपल्या हस्तरेषा…

आपल्या हातांवरील रेषांमध्येच प्रेम यशस्वी होईल की नाही, याचं उत्तर दडलेलं असतं. हस्तरेषा भविष्यात आपल्या पसंतीच्या मुला/मुलीसोबत लग्न होईल की नाही, आपलं लग्न यशस्वी होईल की नाही, याचे संकेत देत असतात. हे खरंय की, जोड्या परमेश्वरच ठरवतो. मात्र आपल्या हस्तरेषांमध्ये प्रेमाची रेषा जर अधिक शक्तीशाली असेल तर आपल्याला प्रेमात यश नक्की मिळेल.

जाणून घ्या हस्तरेषांवरून आपल्या प्रेमाचं भविष्य

बुध पर्वत शक्तीशाली असेल तर – लग्नरेषा ही करंगळीच्या खालच्या भागात असते. करंगळी खाली जो पर्वत असतो त्याला बुध पर्वत म्हणतात. हा बुध पर्वत जितका शक्तिशाली असेल तितकं आपलं प्रेम आणि विवाह यशस्वी होतो. बुध पर्वत उंच असेल तर प्रेमात यश नक्की मिळतं.

बुध पर्वतावर आडवी रेष असेल तर – जर आपल्या हातावरील बुध पर्वतावर आडव्या रेषा असतील तर हे जाणून घ्या जितक्या आडव्या रेषा तितकी प्रेम प्रकरणं. ज्यांच्या हातावर अशा आडव्या रेषा असतात त्यांचे प्रेमसंबंध यशस्वी तर होतात, मात्र त्यांचं वैवाहिक आयुष्य इतकं चांगलं नसतं.

बुध पर्वतावरील रेषा झुकलेल्या असतील तर – बुध पर्वतवरील रेष जर झुकलेली असेल तर आपण प्रेमळ असाल तर आपल्याला प्रेमात यश मिळणार नाही. एवढंच नाही तर अशी हस्तरेषा आपल्या वैवाहिक आयुष्यातही खूप संकटं निर्माण करते.

विवाह रेषेत दोन शाखा असणं – विवाह रेषेच्या सुरूवातीलाच जर त्यात दोन शाखा असतील तर अशा व्यक्तींचं लग्न तुटण्याची शक्यता असते. जर असं लग्न टिकलं तर पती-पत्नींमध्ये पटत नाही.

अनामिकेतील रेषा – जर कुणाच्या अनामिकेजवळील रेषा खाली सूर्य रेषेपर्यंत गेली असेल तर अशा व्यक्तीचा विवाह एका विशिष्ट व्यक्ती सोबतच होतो. असे लोक प्रेमात पडले तर ते यशस्वी होतात. त्यांचं ज्या व्यक्तीवर प्रेम आहे त्याचसोबत विवाह होतो.

विवाह रेषेवर त्रिशूल असणं – ज्या व्यक्तीच्या हातावर विवाह रेषेजवळ त्रिशूलचा आकार तयार होत असेल, अशी व्यक्ती आपल्या वैवाहिक आयुष्यात खूप सुखी राहते. अशा लोकांना आपल्या आवडीची व्यक्ती जोडीदार म्हणून मिळते.

तर मग जर आपलंही कुणावर प्रेम असेल तर आपल्या या हस्तरेषा जाणून घ्या, म्हणजे कळेल आपल्याला प्रेमात यश मिळेल की नाही ते…

 

ग्लोबल न्युज नेटवर्क: