आर्थिक घोटाळा प्रकरणात जामिनावर बाहेर आलेले मोदींना सल्ला देतायंत – अतुल भातखळकर

अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी सोमवारी संसदेत २०२१-२२ या वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर केला. यावर महाविकास आघाडीच्या अनेक बड्या नेत्यांनी जोरदार टीका केली होती. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मोदींना सल्ला दिला आहे.

आज अखेर महिनोंमहिने शेतकऱ्यांना आंदोलन करावे लागते आहे. पंतप्रधान मात्र याकडे लक्ष द्यायला तयार नाहीत. कृषी कायदे रद्द करा… मागे घ्या… तो रिफिल करा… नवीन कायदा बनवायचा असेल तर नवीन बनवा आणि शेतकऱ्यांबरोबर चर्चा करा असा सल्ला भुजबळ यांनी मोदींना दिला होता. यावर आता भाजपा प्रवक्ते अतुल भातखळकर यांनी भुजबळांना टोला लगावला आहे.

’कृषी कायदे रद्द केले तर असं काय बिघडणार आहे?’…आर्थिक घोटाळे प्रकरणात जामिनावर सुटका झालेले छगन भुजबळ पंतप्रधान नरेंद्र मोदींना कृषी कायदे रद्द करण्याचा सल्ला देत आहेत…असं म्हणत भातखळकर यांनी भुजबळ यांना टोमणा मारला आहे.

Team Global News Marathi: