शेतकऱ्यांनी सीमा ओलांडू नये म्हणून दिल्ली पोलिसांची महामार्गावर लावले शेकडो बॅरिकेड्स

केंद्राने पारित केलेल्या नव्या कृषी कायद्याविरोधात शेतकरी मागच्या २ महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहे. त्यात २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी लाल किल्यावर पोलीस आणि शेतकरी आंदोलकांमध्ये झालेल्या झटापटीमुळे सर्व देशभरातून केंद्र सरकारवर जोरदार टीका होत होती.

शेतकरी संघटनांनी येत्या ६ फेब्रुवारी रोजी देशव्यापी चक्का जाम आंदोलनाची हाक दिली आहे. संयुक्त किसान मोर्चाचे नेते बलबीरसिंग राजेवाल यांनी ही घोषणा केली. ६ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ ते ३ यावेळात हे चक्का जाम आंदोलन केले जाणार आहे. या वेळेत देशातील सर्व रस्ते अडवले जातील, असे राजेवाल म्हणाले. आता हे आंदोलन दाबण्यासाठी दिल्ली पोलिसांनी सुद्धा कंबर कसली आहे.

 

दिल्ली पोलिसांकडून गाझीपूर सीमा, टिकरी सीमा आणि सिंघू सीमेवर कडक सुरक्षा व्यवस्था केली जात आहे. आंदोलनकर्ते पुन्हा दिल्लीकडे ट्रॅक्टर अनु नये यासाठी सीमेवर मोठ्या प्रमाणात बॅरिकेट्स लावण्यात आले आहेत. तसेच, रस्त्यांवर खिळे ठोकण्यात आले आहेत. काटेरी ताराही लावण्यात आले आहेत. याशिवाय आर्मी मेरीट वर्कशॉपमधून दोन क्रेनही आणण्यात आल्या आहेत.

Team Global News Marathi: