IPL सट्टेबाजांकडून सचिन वाझे याने मागितली होती १५० कोटीची खंडणी, निलेश राणे यांचा आरोप

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटके भरलेली स्कॉर्पिओ ठेवल्या प्रकरणात तब्बल १३ तासांच्यावर सचिन वाझे यांची एनआयए’कडून चौकशी करण्यात आली होती. अखेर १३ तासांच्या चौकशीनंतर वाझे यांना एनआयए’कडून अटक करण्यात आली होती आता त्या पाठोपाठ या संपूर्ण प्रकरणावर पत्रकार परिषद घेऊन भाजपा आमदार नितेश राणे यांनी भाष्य केले आहे.

यावेळी त्यांनी अनेक खळबळजनक खुलासे पत्रकार परिषदेत केले होते. कोरोनाच्या संकट मार्च-एप्रिलमध्ये खेळली जाणारी IPL मॅच नोव्हेंबर मध्ये खेळण्यात आली होती. या मॅचवर सट्टा लावणाऱ्या सर्व बुकींना सचिन वाझे यांनी १५० कोटीची खंडणी मागितल्याचा खळबळजनक आरोप आमदार राणे यांनी केला आहे.

या सट्टेबाजांना तुमचं लोकेशन आणि तुमची सर्व माहिती मला माहीत आहे. तुमच्यावर छापा पडू द्यायचा नसेल तर मला दीडशे कोटी रुपये द्या, अशी धमकी वाझेंकडून या सट्टेबाजांना दिली जात होती, असा दावा नितेश राणे यांनी केला आहे. तसेच या सर्व प्रकरणात शिवसेनेच्या एका जवळच्या व्यक्तीचे नितेश नाव राणे यांनी घेतले होते.

Team Global News Marathi: