भोकं पडलेला फुगा, बेडूक अशा उपमा राणेंना दिल्यामुळे रश्मी ठाकरेंविरोधात तक्रार दाखल

 

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबाबत वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मंगळवारी अटक करण्यात आली होती. त्यादिवसापासून शिवसेना विरुद्ध नारायण राणे यांच्यातील वाद वाढलेला दिसून आला होता. त्यातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यामध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांविरोधात केलेल्या वक्त्याव्याप्रकरणी भाजपच्या नेत्यांनी ठिकठिकाणी तक्रार दाखल केल्या आहेत. त्याच प्रमाणे भाजपने थेट नाशिकमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पत्नी आणि सामना वृत्तपत्राच्या संपादक रश्मी ठाकरे विरोधात तक्रार केल्याचे समोर आले आहे.

बुधवारी शिवसेनेने सामना या त्यांच्या मुखपत्रातून नारायण राणे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. भोकं पडलेला फुगा, असा टोला शिवसेनेने राणे यांना लगावला. तसेच बेडूक, छपरी गँगस्टर, उपटसुंभ, सरडा अशा उपमा देत राणेंवर निशाणा साधला होता. कालच्या सामनाच्या अग्रलेखाचा मोठा पोस्टर नाशिकमध्ये शिवसैनिकांनी लावला होता. त्यामुळे आता राणेंवर सामनातून खालच्या दर्जाच्या टीका केल्यामुळे भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे.

याप्रकरणी सामना वृत्तपत्राच्या संपादक रश्मी ठाकरेंविरोधात नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात भाजपच्या एका पदाधिकाऱ्याने तक्रार दाखल केली आहे. तसेच लवकरात लवकर पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भाजप पदाधिकाऱ्यांनी केली आहे. त्यामुळे येणाऱ्या ददिवसांमद्ध्ये भाजपा आणि शिवसेना पक्षातील वाद आणखी चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे

Team Global News Marathi: