“फी भरली नाही म्हणून शाळेने २८ विद्यार्थ्यांचे दाखले धेट पोस्टाने पाठवले घरी”

 

खारघर | | सध्या संपूर्ण देशात कोरोनाने हाहाकार माजवल्यामुळे सध्या राज्यात ऑनलाइन वर सुरु करण्यात आलेले आहे. मात्र असे असले तरी काही शाळा प्रशासनाने विद्यर्थी वर्गाकडून फी वसुलीसाठी विविध उपाययोजना अवलंबल्या आहे. यामुळे पालक आणि विद्यार्थी वर्गाच्या चिंतेत अधिक भर पडली आहे. असा काहीसा प्रकार खारघर येथील इंटरनॅशनल स्कूलमध्ये घडला आहे.

शाळेची फी भरली नाही म्हणून खारघर येथील विश्वज्योत स्कूलच्या व्यवस्थापनाने २८ विद्यार्थ्यांचा प्रवेश रद्द करून त्यांचे शाळा सोडल्याचे दाखले थेट पोस्टाने घरी पाठवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शाळेच्या या मग्रुरीमुळे कोरोना महामारीत अडचणीत असलेल्या पालकांपुढे आता आणखी एक नवे संकट उभे राहिले आहे.

सध्याचा काळ हा आमच्यासाठी फार खडतर आहे, त्यामुळे आमच्या मुलांचे शिक्षण बंद करू नका, अशी विनंती पालकांनी शाळा व्यवस्थापनाला केली. मात्र व्यवस्थापन फी वसुलीच्या कमर्शियल भूमिकेवर आडून राहिल्याने या मुलांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आले आहे. त्यामुळे शाळेने काढून टाकलेल्या सर्व मुलांना पुन्हा दाखल करून घेऊन त्यांचे शिक्षण सुरू करण्यासाठी करण्यासाठी युवासेना या शाळेवर धडक देणार आहे.

मागच्या वर्षी कोरोना महामारीमुळे शाळेचे वर्ग वर्षभर बंद होते. तरीही शाळा व्यवस्थापनाने नेहमीप्रमाणे सर्वच फी भरण्याचा तगादा पालकांच्या मागे लावला होता. यंदाचे शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर शाळा व्यवस्थापनाने पालकांना सर्वच फी भरण्याची सूचना केली. मात्र ज्यांनी फी भरली नाही, अशा २८ विद्यार्थ्यांचे फक्त शिक्षणच थांबवले नाही तर त्यांना थेट शाळेतून काढून टाकले. तुमच्या मुलांना शाळेतून काढून टाकले आहे, हे पालकांना माहिती व्हावे यासाठी शाळा सोडल्याचे दाखले विद्यार्थ्यांच्या घरी पाठवले. यासंदर्भात अनेक पालकांनी युवा सेनेकडे तक्रारी केल्यानंतर युवा सेना सहसचिव रुपेश पाटील यांनी त्यांची गंभीर दखल घेतली आहे.

Team Global News Marathi: