बंगळुरू स्थित निओबॅंकेने आजच्या पिढीतील नोकरदार वर्गासाठी असलेल्या एफआयच्या लॉंचबद्दल घोषणा केली. एफआयची स्थापना लोकांना पैसे मिळवण्यासाठी मदत व्हावी आणि आजच्या पिढीतील लोकांना पैशाचा योग्य वापर करता यावा, अधिक बचत करावी आणि हुशारीने खर्च करावा या सक्षम उद्देशाच्या दृष्टीने करण्यात आली होती. एफआयने फेडरल बॅंकेसोबत भागीदारी केली आहे, ज्यांच्या माध्यमातून 3 मिनिटांच्या आत डेबिट कार्ड असलेले झटपट बचत खाते उघडून देता येते.
2019 मध्ये स्थापना झालेले एफआय हे सुजीथ नारायणन आणि सुमीत ग्वलानी या Google च्या माजी कर्मचारी ज्यांनी सर्वप्रथम Gpay ची स्थापना केली त्यांच्याच कल्पनेतून उतरले आहे. हे परस्परसंवादी, वयक्तिकृत आणि पारदर्शक बॅंकिंग अनुभव देऊ करते. वापरकर्त्यांना उपयुक्त वैशिष्ट्यांनी युक्त बचत खात्याचा आणि त्यांच्या पैश्यांबद्दल, ते पैसे वाढवण्यासाठी आणि त्यांचे धन योग्यरीत्या मांडणी करून ठेवण्याबाबत माहिती मिळवण्याच्या साधनांचा अॅक्सेस मिळतो. एफआय ग्राहकांना डिजीटल पेमेंट्सकडून- विमा, कर्ज आणि गुंतवणूकीच्या संधींसारख्या इतर सेवांच्या आर्थिक वाटचालीकडे लक्ष देते.
लॉंचबद्दल बोलत असताना एफआयचे सीईओ आणि सहसंस्थापक सुजीथ नारायणन म्हणाले की, “डिजीटलयुगाच्या-पहिल्या सहस्त्रकातील पिढीला त्यांच्या पैशासोबत संवाद साधू देणार्या एका कल्पक नवीन माध्यमाशी ओळख करून देताना आम्हाला प्रचंड उत्साह वाटत आहे. त्यांच्या पैशाबद्दल असलेल्या विविधांगी ध्येयांना साध्य करण्याच्या प्रवासामधील एक सक्षम सहकारी बनण्याचे एफआयचे ध्येय आहे ज्यातून त्यांच्या आर्थिक उलाढाली सुलभ होऊ शकतील आणि बचत करणे फारसे अवघड राहणार नाही. आमच्या या प्लॅटफॉर्मवर आघाडीच्या तंत्रज्ञानाचा आणि डेटा विज्ञानाचा वापर केला जातो ज्यातून वापरकर्त्यांना क्रियात्मक माहितीच्या आधारावर नियंत्रण मिळवता येऊ शकते आणि त्यांच्या आर्थिक गरजांसाठी अधिकाधिक उपयोग करून घेता येऊ शकेल. पहिल्यांदाच सादर होत असलेले, वैयक्तीकृत, मुक्त आणि पारदर्शक बॅंकिंग अनुभव व दीर्घकाळ टिकतील असे ग्राहक नातेसंबंध बनवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”
सभारंभाच्या वेळी बोलत असताना फेडरल बॅंकेच्या रिटेल क्षेत्रातील कार्यकारी संचालिका, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवसाय प्रमुख असलेल्या कु. शालिनी वारियर म्हणाल्या, “निओबॅंक, एफआय या नवकल्पनेचे एकमेव भागीदार म्हणून पुढे येताना आम्हाला खूप आनंद होत आहे. दोन्ही संस्थांना जे सर्वोत्तम देऊ करायचे आहे त्यासाठी हे जुळून आलेले एक समीकरणच आहे. अॅपच्या माध्यमातून सुलभ ग्राहक अनुभव प्रदान करत असताना व्यवहारांना फेडरल बॅंकेकडून स्थिरता, सुरक्षितता आणि तंत्रज्ञानात्मक साध्यता प्राप्त करून देते. नोकरदार नवी पिढी ही या नवीन डिजीटल अनुभवाचे स्वागतच करेल. अर्थतंत्रज्ञान आणि बॅंकिंग या दोन्ही क्षेत्रातील सर्वोत्तम असे काहीतरी ग्राहकांना प्रदान करण्यात येते आहे”.
हे अॅप ग्राहकांच्या गरजा जाणून घेते, त्यांना काय हवे आहे ते समजून घेते आणि त्यांच्या आर्थिक उद्दिष्ट्यांची पूर्तता करून घेण्यासाठी त्यांना हलकेच सजग बनवते. एफआयची डिझाइन हे डिजिटलयुगातील पिढीला उद्भवणार्या अडचणी कमी करते. एफआय अॅपचा दृष्टीकोन हा अद्याप नवीनच आहे कारण पैशांची बचत केल्याबद्दल वापरकर्त्यांना बक्षिसे देखील मिळणार आहेत – जे मार्केटमध्ये अद्याप कधीच झालेले नाही.