“शेतकरी कंबरेएवढ्या पाण्यात उभा असताना राष्ट्रवादीचे सोहळे”

 

मराठवाडा आणि विदर्भामध्ये पावसाने अक्षरश झोडपून काढले आहे. याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या होता-तोंडाला आलेला घास या पावसाच्या पाण्याने हिरावून घेतला आहे. तर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे सोहळे सुरू असल्याची टीका भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी केली आहे. तसेच मागील २ वर्षांपासून शेतकऱ्यांना अनुदान मिळालं नसल्याचा आरोप मुंडे यांनी केला आहे.

पंकजा मुंडे यांनी तातडीने नजर पंचनामे करुन शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी केलीय. तसेच केवळ पिकांना नाही तर वाहून गेलेली जमीन, गुरंढोरं, मालमत्तेचं नुकसान यासाठीही पॅकेजची घोषणा करण्याची मागणी केली आहे. त्या काल पत्रकार माध्यमांशी बोलताना त्यांनी अप्रत्यक्ष टीका मंत्री धनंजय मुंडे यांचावर केली होती.

पंकजा मुंडे म्हणाल्या, “पूरग्रस्तांना तातडीने मदत देण्यासाठी सर्वात आधी प्रशासन आणि शासन हे हलायला पाहिजे. पालकमंत्र्याने त्यांच्या जिल्ह्यातील प्रत्येक बारीक विषय मंत्रिमंडळ आणि मुख्यमंत्र्यापर्यंत नेला पाहिजे. त्यासाठीच पालकमंत्री असतात. त्यामुळे आधी पालकमंत्र्यांनी आपआपल्या जिल्ह्यात गेलं पाहिजे. जेव्हा आम्ही बांधावर गेलो त्यानंतर बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे शेतकऱ्याच्या बांधावर गेले. आधी खासदार प्रीतम मुंडेंनी पुराची पाहणी केली. त्यावेळी राष्ट्रवादीचे मोठमोठे सोहळे चालले होते. खरंतर तेव्हा नुकतीच जिल्ह्यात अतिवृष्टी होऊन गेली होती. त्याचे संवादाचे मेळावे न होता सोहळे झाले.”

Team Global News Marathi: