“अमित शाह यांचं घर दलितविरोधी राजकारणाच घर”

 

कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी दिलेल्या तडकाफडकी राजीनाम्यामुळे पंजाबमध्ये एकाच खळबळ उडाली होती. तसेच त्यांनी पक्षनेतृत्वावर घणाघात टीका केली होती. त्यातच काल कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेतली.तर दुसरीकडे काँग्रेसने या भेटीवरून भाजप पक्षावर निशाणा साधला आहे.

आता या भेटीवर काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुर्जेवाला यांनी अमित शाह यांचं घर दलितविरोधी राजकारणाचं केंद्र झाल्याची टीका केली आहे. ते पुढे म्हणाले,’एका दलित व्यक्तीला पंजाबचा मुख्यमंत्री बनवल्याने सत्तेत बसलेल्यांच्या गर्वाला धक्का लागला आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये नक्की निर्णय़ कोण घेत आहे, असा सवाल ते उपस्थित करत आहे.

ते पुढे म्हणाले,’अमित शाह यांचं घर दलितविरोधी राजकारणाचं केंद्र झाल्याची टीका काँग्रेसने केली आहे. एका दलित व्यक्तीला पंजाबचा मुख्यमंत्री बनवल्याने सत्तेत बसलेल्यांच्या गर्वाला धक्का लागला आहे.’ असं म्हणत त्यांनी भाजप पक्षावर टीका केली आहे. आता या टीकेला भाजपा काय प्रतिक्रिया देते हे पाहावे लागणार आहे.

Team Global News Marathi: