शेतकऱ्याने हरभरा पीकच उपटून बांधावर फेकले, शेतकर्यांमध्ये नाराजीचे वातावरण

 

नांदेड | अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांचे न भरुन निघणारे नुकसान झाले होते. पण रब्बीसाठी पोषक वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे खरिपात झालेले नुकसान रब्बी हंगामातू भरुन काढण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी व्यक्त केला होता.मात्रस निसर्गाचा लहरीपणा रब्बी हंगामातही कायमच राहिलेला आहे. ज्या हरभरा पिकाचा सर्वाधिक पेरा या हंगामात झालेला त्याच पिकावर वातावरणातील बदलाचा फटका बसलेला आहे.

नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील येनंदापेंदा शिवारातील हरभरा पीक बहरले पण फळधारणाच झाली नाही. त्यामुळे शेतकऱ्याने उभ्या हरभरा पिकावरच कुळव घातला आहे. पेरणीपासून तळहाताच्या फोडाप्रमाणे जोपसणा करुनही पिकाची ही अवस्था झाल्याने शिवाजी बोईनवाड शेतकऱ्याने हे टोकाचे पाऊल उचलले आहे. हरभरा पिकावर वखर फिरवल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. त्यामुळे खरिपात झालेले नुकसान रब्बी हंगामातून भरुन काढायचे तर सोडाच पण उत्पादनावर झालेला खर्चही काढणे आता मुश्किल झाले आहे.

उत्पादन वाढीच्या अनुशंगाने यंदा शेतकऱ्यांनी पीक पध्दतीमध्ये बदल केला आहे. गहू, ज्वारी या मुख्य पिकांची जागा यंदा हरभरा पिकाने घेतली आहे. सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस आणि हंगामाच्या सुरवातीला असलेले पोषक वातावरण यामुळे हा बदल झाला होता. शिवाय कृषी विभागाकडूनही याबाबत जनजागृती केली होती. त्यामुळेच मराठवाड्यात यंदा प्रथमच हरभऱ्याचे क्षेत्र हे वाढलेले आहे. त्यानंतर शेतकऱ्यांनी गव्हाला पसंती दिली असून मुख्य पीक असलेले ज्वारी यंदा तिसऱ्या क्रमांकावर गेलेली आहे. पेरणीपासून उत्पदानात वाढ होईल या अुनशंगानेच शेतकऱ्यांनी प्रयत्न केले आहेत मात्र, निसर्गाचा लहरीपणा खरीपप्रमाणेच रब्बी हंगामातही पाहवयास मिळत आहे.

Team Global News Marathi: