इंदूर : लोकसभेच्या माजी अध्यक्ष सुमित्रा महाजन यांना गुरुवारी इंदूरच्या बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तसेच त्यांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली होती. मात्र एकीकडे त्या उपचार घेत असताना त्यांच्या मृत्यूची बातमी संपूर्ण देशभरात वाऱ्यासारखी पसरली. विशेष म्हणजे राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, काँग्रेस नेते शशी थरूर यांनी सोशल मीडियावर ट्वीट करुन त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यामुळे ही अफवा पसरली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार ही बातमी खोटी असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. मात्र सुमित्रा महाजन यांच्या निधनाची बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. दोनच दिवसांपूर्वी त्यांना टॅन आणि सदर झाल्यामुळे इंदूरमधील कखाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याशिवाय गुरुवारी त्यांची कोरोना चाचणी केली असताना ती सुद्धा निगेटिव्ह आली होती.
मात्र त्यात त्यांच्या मृत्यूची बातमी पसरल्यामुळे खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट केले होते. माजी लोकसभा अध्यक्ष सुमित्राताई महाजन यांचे निधन झाले.ही बातमी दुःखद व वेदनादायी आहे.त्या लोकसभा अध्यक्ष असताना व त्यापुर्वी देखील त्यांच्याशी अनेकदा भेट झाली होती.त्यांच्या निधनामुळे राजकीय व सामाजिक क्षेत्रातील एक अतिशय प्रेमळ व्यक्तिमत्त्व हरपले. भावपूर्ण श्रद्धांजली असे ट्विट त्यांनी केले होते. तसेच काँग्रेस नेते शशी थरूर यांनी सुद्धा ट्विट करून श्रद्धांजली वाहिली होती.