” खोट्या केसेस, दबावापुढे झुकणार नाही, महाविकास आघाडी कारवायांना सडेतोड उत्तर देणार”

 

पुन्हा एकदा विरोधकांच्या टीकेला राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. केंद्रीय तपास यंत्रणांकडून खोट्या केसेस दाखल करुन नेत्यांमध्ये दहशत निर्माण करण्याचं काम सुरु आहे. मात्र, खोट्या केसेस आणि केंद्रीय तपास यंत्रणांद्वारे टाकण्यात येणाऱ्या दबावापुढे कुणीही झुकणार नाही. तसेच महाविकास आघाडीतील तिनही पक्ष अशा कारवायांना सडेतोड उत्तर देतील, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी केला.

पुढे मलिक म्हणाले की, ईडीच्या नोटीसमुळे राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आलं. दोन वर्षांपूर्वी अशीच ईडीची नोटीस पवारांनी आली आणि राज्यात आमचं सरकार आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागा वाढल्या. माझ्या जावयावर आरोप केले. मी कोर्टात लढत आहे. त्यांच्याकडे काय पुरावे आहेत? असा सवालही मलिक यांनी केला आहे.

नरेंद्र मोदी स्वत:ला हिंदूंचे नेते म्हणून सांगतात. आता त्यात राज ठाकरे यात असतील तर चांगली गोष्ट आहे. नेते जनतेचे असतात. गर्व से कहो हम हिंदू है असं बोलायला त्यांनी सुरुवात केलीय. धर्माच्या राजकारणावर आम्ही राजकारण करत नाही, अशी टीका मलिक यांनी राज ठाकरेंवर केलीय. तसंच सर्वांना इदच्या शुभेच्छा दिल्या.

Team Global News Marathi: