शिवसेना-राष्ट्रवादीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर, वाचा काय आहे प्रकरण

 

राज्यात एकीकडे शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र सत्ता उपभोगताना दिसून येत असून दुसरीकडे माता या तिन्ही पक्षातील नेत्यांमध्ये स्थानिक पातळीवर वाढ होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यातच भुजबळ आणि कांदे हा वाद ताजा असताना आता साताऱ्यात शिवसेना-राष्ट्रवादीच्या अंतर्गत वादात एक वेगळंच नाट्य पहायला मिळालं.

 

राष्ट्रवादीचे माजी आमदार शशिकांत शिंदेंना शह देण्यासाठी खटाव-कोरेगाव मतदारसंघाचे शिवसेना आमदार महेंश शिंदे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना होर्डिंगवर स्थान दिलं आहे. सातारा जिल्ह्यातील खटाव हा भाग दुष्काळग्रस्त भाग म्हणून ओळखला जातो. या भागातील लोकांसाठी महत्वाची मानली जाणारी जिहे-कठापूर पाणी योजना ही गेली २६ वर्ष रखडली होती. या योजनेचं काम अत्यंत धीम्या गतीने सुरु होतं.

मात्र २६ वर्षांनी या योजनानुसार नेर तलावात पाणी आल्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण होतं. दुष्काळी भागातील शेतकऱ्यांसाठी ही पाणी योजना अत्यंत महत्वाची मानली जाते. खटाव भागात राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांचं वर्चस्व मानलं जातं. शशिकांत शिंदे स्वतः जलसंपदा मंत्री असतानाही ही योजना पूर्ण होऊ शकली नाही. परंतू नेर तलावात पाणी आल्यानंतर वाढदिवसाचा मुहुर्त साधून शशिकांत शिंदेनी योजनेच्या उद्घाटनाचा कार्यक्रम ठेवला.

मात्र दुसरीकडे २०१९ विधानसभा निवडणुकीत शशिकांत शिंदेंचा पराभव करणारे शिवसेना आमदार महेश शिंदेंनी भल्या पहाटे या भागात जलपूजन करत योजनेचं उद्घाटन केलं. शशिकांत शिंदेच्या वाढदिवशी होणारा कार्यक्रम व्हायच्या आधीच आमदार महेश शिंदेनी या योजनाचं उद्घाटन केल्यामुळे राजकीय वर्तुळात आता चर्चा रंगली आहे.

Team Global News Marathi: