“फडवीस हे काही मूळचे आडनाव नाही, ते मुळचे पर्शियन नाव आहे जे आहे फरदवणीस”

 

सध्या पुणे महानगर पालिका निवडणुकीला काही दिवस शिल्लक राहिलेले असताना पक्ष बांधणी मजबूत करण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे तीन दिवस पुणे दौऱ्यावर आहे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची वाढदिवसानिमित्त भेट घेतल्यानंतर पत्रकार माध्यमाशी संवाद साधताना राज ठाकरे यांनी फडणवीसांच्या आडनावर भाष्य केले होते.

पुण्यात पत्रकार माध्यमांशी संवाद साधताना राज ठाकरे म्हणाले की, फडवीस हे काही मूळचे आडनाव नाही, ते मुळचे पर्शियन नाव आहे जे आहे फरदवणीस. याचा अर्थही राज ठाकरेंनी समजावून सांगितले आहे.फर्द म्हणजे कागद आणि नवीस म्हणजे लिहिणारा म्हणजेच कागदावरती लिहिणारा असा अर्थ सांगत त्यांनी इतिहासाचा दाखला दिला.

राज ठाकरे यांनी आज बाबासाहेब पुरंदरे यांच्या वाढदिवसानिम्मित पुण्यात त्यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या आणि त्यांना भेटल्यानंतयर, त्यांच्या सोबतच्या भेटीत इतिहासाबद्दल नेहमीच नवीन माहिती मिळते ते फक्त शिवचरित्र सांगत नाही तर आजच्या घटनांना इतिहासाचा दाखल देत त्या समजावून सांगतात हेच सांगताना राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या आडनावाचा अर्थ समजावून सांगितला.

Team Global News Marathi: