पेगासिस’ची चिंता सोडा, ‘पेंग्विन’ची चिंता करा चित्रा वाघ यांचा संजय राऊतांना टोला

 

पेगासिस अर्थात फोन टँपिंगच्या मुद्द्यावरून देशभरातील वातावरण तापलेले असताना याच मुद्द्यावरून मना अग्रलेखातून तसेच पत्रकार परिषदेत शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार टीका केली होती. आता या तिला भाजपा नेत्या चित्र वाघ यांनी प्रतिउत्तर दिले आहे.

संजयजी पेगासिसची चिंता सोडा ‘पेंग्वीनची’ चिंता करा. आज ज्या युवराजांच्या ‘प्रिय’ ठेकेदारामुळे ‘डोरी’चा जीव गेला त्याच हायवे कंस्ट्रक्शन कंपनीला कोविड रुग्णासाठी ‘प्राणवायु’ पुरवठ्याचा ठेका दिला आहे”, असं ट्विट चित्रा वाघ यांनी केलं आहे.

तसंच मुंबईकरांच्या जीवाशी खेळणाऱ्या याच कंपनीच्या दिरंदाई व गचाळ कारभारासाठी फक्त ०.५ टक्के दंड आकारला गेला का आणि कोणासाठी?, असा सवालही चित्रा वाघ यांनी उपस्थित केला आहे. पेगॅसस प्रकरण जर सरकारला गंभीर वाटत नाही तर मग हे रहस्यमय वाटतं. पेगॅसस प्रकरणाचा खरा सुत्राधार कोण आहे हे देशाला जाणून घेण्याचा अधिकार आहे असं राऊत यांनी सामना अग्रलेखात म्हंटले होते.

 

Team Global News Marathi: