“फडणवीस हे एकनाथ शिंदेंचे उजवे हात, दोघांनी मिळून राज्य पुढे न्यावं”

 

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी ३० जून रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होणार आणि शिंदे उपमुख्यमंत्री होणार हे त्यांच्या शपथविधीच्या काही तास आधीपर्यंत लोकांना समजत होते. मात्र शपथविधीच्या काही वेळापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन सर्वांनाच चकित केले. एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यावर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटणं दिसून येत आहे,

अशातच आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया देताना फडणवीसांना टोला लगावला आहे. देवेंद्र फडणवीस हे एकनाथ शिंदेंचे उजवे हात आहेत. आता दोघांनी मिळून राज्य पुढे न्यावं, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. नव्या सरकारला कोणतेही अडथळे निर्माण करणार नाही. शिंदे आणि फडणवीस यांना शुभेच्छा, असंही राऊत म्हणाले.

फडणवीसांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारल्यासंदर्भात त्यांना विचारलं असता ते म्हणाले की, त्यांच्या पक्षात वरिष्ठांचे आदेश पाळण्याची परंपरा आहे. पक्षादेश पाळावा लागतो, आम्हीही पाळतो, तोच त्यांनीही पाळला, असं राऊत यांनी म्हटलं आहे. शिवसैनिकाला मुख्यमंत्री केलं असं म्हणणार नाही. जिथे ठाकरे तिथे शिवसेना, ते पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरेंना मानतात याचा आनंद आहे, असं देखील संजय राऊत म्हणाले.

Team Global News Marathi: