दोनशे बिहारी आणून.’, म्हणत कूकने अभिनेत्री माही विजला दिली धमकी

 

अभिनेत्री माही विज हिने तिच्या कूकने जीवे मारण्याची धमकी दिल्याचे ट्वीट केले होते. आता हे ट्वीट व्हायरल होत आहेत. माहीने त्यात लिहिले होते की, तिच्याकडे व्हिडिओदेखील आहे. अशातच आता एका मुलाखतीत तिने संपूर्ण घटना सांगितली आहे.भिनेत्री माही विज हिने सांगितले की, कूक काही काळापासून तिच्याकडे काम करत होता. तिला समजले की, तो चोरीदेखील करत आहे. त्यावेळी तिचा पती आणि अभिनेता जय भानुशाली जयने त्याचा हिशोब करायचे ठरवले, तेव्हा त्याने संपूर्ण महिन्याचा पगार मागू लागला. यावर चर्चा वाढली आणि त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. माहीने सांगितले की, तिला आपली नाही, तर मुलीची काळजी आहे.

माध्यमांतील वृत्तानुसार, माही विज हिने सांगितले की, तिच्या नानीने तिला कूकबाबत सावध केले होते. माहीने पुढे सांगितले की, “तीन दिवसच झाले होते आणि आम्हाला त्याच्या चोरीबाबत सांगण्यात आले. मी जयला सांगण्याची वाट पाहत होती. जेव्हा जय आला, तेव्हा तो हिशोब करू पाहत होता. मात्र, त्याला संपूर्ण महिन्याचा पगार हवा होता. जेव्हा जयने त्याला कारण सांगितले, तर म्हणाला की, ‘२०० बिहारी इथे उभे करेल.’ तो दारू पिऊन आम्हाला शिव्या देऊ लागला. आम्ही पोलिसांकडेही गेलो.”

माहीने सांगितले की, तो माणूस तिला फोन करून धमकावत होता. माहीने सांगितले की, त्यांच्याकडे रेकॉर्डिंगही आहे. ती म्हणाली की, “आजूबाजूला जे काही चालले आहे, ते बघून मला भीती वाटते. जर त्याने खरोखरच मला चाकू खुपसला तर? मला काही झाले, तर लोक नंतर विरोध करतील, त्याचा काय उपयोग. मला माझ्या कुटुंबाच्या सुरक्षिततेची भीती वाटते.” माही म्हणाली, “मी ऐकले आहे की, तो जामीन घेऊन बाहेर येणार आहे. तुरुंगातून सुटून तो आपल्या कुटुंबावर किंवा आपल्या मुलीचा बदला घेईल अशी भीती तिला वाटते.

Team Global News Marathi: