फडणवीस यांच्या पेन ड्राईव्ह बॉम्बवर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया,

 

मुंबई | विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानभवनात एक गौप्यस्फोट करत खळबळ उडवून दिली आहे. विशेष सरकारी वकील आणि काही पोलीस अधिकाऱ्यांना हाताशी धरुन विरोधी पक्षातील नेत्यांना खोट्या प्रकरणात अडकवण्यात येत असल्याचं षडयंत्र रचलं जात असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीसांनी केला. आता फडणवीसांच्या या आरोपांनंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

शरद पवार म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोपांचा काही भाग समजला नाही. सरकारी अधिकाऱ्यांचं 125 तासांचं रेकॉर्डिंग होतं हे कौतुकास्पद आहे. केंद्रीय यंत्रणांचा वापर केल्याशिवाय हे शक्य नाही. आरोपांबाबत खोलात गेलो नाही. आरोपांची राज्य सरकारने चौकशी करावी.

तसेच पुढे बोलताना फडणवीस म्हणाले की, माझे अप्रत्यक्षपणे नाव घेतलं गेलं. पण माझा काही संबंध नाही. रेकॉर्डिंगच्या सत्यतेबाबत पडताळणी करणं गरजेचं आहे. सरकार गेल्यामुळे भाजप अस्वस्थ. सत्तेचा गैरवापर करुन चौकशी कशी केली जाते याचं अनिल देशमुख हे उत्तम उदाहरण आहे. सत्ताधाऱ्यांना नाउमेद करण्याचा प्रयत्न आहे. पण सरकारला कुणीही धक्का लावू शकत नाही. सरकार 5 वर्षे टिकेल असंही शरद पवार म्हणाले.

Team Global News Marathi: