“देवेंद्र आहेत, ते तळपती तलवार आहेत भ्रष्टाचाऱ्यांनो तुमचा लवकरच बाजार उठवणार.”

 

मुंबई | विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी लक्षवेधी मांडत उपस्थित केले आहे. सरकार पोलिसांचा गैरवापर करत असल्याचा आरोपही केला. महाराष्ट्रातल्या राजकीय संस्कृतीमध्ये आपण एकमेकांचे विरोधक आहोत पण शत्रू नाहीत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी लक्षवेधी मांडत उपस्थित केले आहे. फडणवीसांनी केलेल्या या आरोपांनी राज्यातील राजकारणात एकच खळबळ उडाली. त्याच दरम्यान आता भाजप नेते अतुल भातखळकर यांनी एक सूचक ट्विट केलं आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत काही व्हिडिओ क्‍लिप सादर केल्या. तब्बल सव्वाशे तासांचं व्हिडिओ फूटेज आपल्याकडे असल्याचा दावा फडणवीसांनी यावेळी केला. त्यातील काही संभाषणातील भाग असल्याचा दावा करत ते वाचून दाखवले. ”अनिल देशमुखांनी बदल्यांमध्ये खूप पैसे कमावले. 100 कोटींपेक्षा जास्त.. कदाचित अडीचशे कोटी तरी असतील. अनिल देशमुख आपल्या कामी आला असता. अनिल देशमुख गेल्यामुळे खूप नुकसान झाले आहे. वळसे काहीच करत नाहीत.’

”पवार साहेब तयार आहेत. जूनमध्ये संजय पांडे रिटायर होतो आहे. आता तो मुंबई सीपी झाला आहे. त्याने सांगितले की, मी केस रजिस्टर करून देतो. त्याच बोलीवर आपण त्याला बसविले आहे. मी रजिस्टर करायला लावतो, असे त्याने सांगितले आहे. जयंत पाटील साहेब बोलून घेतील. तुम्ही ईडीकडे तक्रार करा. मग त्यांनी कारवाई केली नाही की दर दोन दिवसांनी पत्रपरिषद घ्यायची.

तुम्ही आरोप करा. मग आम्ही हायकोर्टात जाऊ. तोवर मेडिकलची फाईल सापडेल. भाजपाला 10 कोटी रुपये देणगी मिळाली, याची तुम्ही तक्रार करा. या एका पत्रामुळे नवाब मलिकची चौकशी स्टॉप होईल.’ असे संभाषण त्यात आहे.

Team Global News Marathi: