फडणवीस ब्राह्मण असल्याने मुख्यमंत्री होऊ दिले नाही : ब्राह्मण महासंघाचा आरोप

मुंबई : काल महाराष्ट्राच्या नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. पण भाजपकडे बहुमत असतानाही भाजपने मुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदे यांना दिले. त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर पसरला आहे. त्याचबरोबर ब्राम्हण महासंघाने भाजपच्या नेतृत्वावर टीका केली आहे. फडणवीस हे ब्राम्हण असल्यामुळे त्यांना मुख्यमंत्री होऊ दिले नाही अशी टीका ब्राम्हण महासंघाने केली आहे.

राज्यात संपूर्ण बहुमत असून देखील देवेंद्र फडणवीस यांना सत्तेपासून दूर ठेवले गेले. असा आरोप ब्राह्मण महसंघाचे अध्यक्ष डॉ. गोविंद कुलकर्णी यांनी केला आहे. भाजप जाणून बुजून ब्राह्मण समाजाचे खच्चीकरण करत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे.

 

नितीन गडकरी यांच्यासोबत देखील भाजपने मुद्दाम असाच खेळ केला आणि फडणवीस यांच्यासोबतही असाच खेळ केला आहे. फडणवीस केवळ ब्राह्मण असल्यानेच भाजपने त्यांना मुख्यमंत्री होऊ दिले नाही असा आरोप केला जात आहे.

 

ग्लोबल न्युज नेटवर्क: