फडणवीसांनी शहांकडे कारवाई करण्याची मागणी केलेले शिवसेनेचे ते दोन बडे मंत्री कोण ?


नवी दिल्ली : अंबानी यांच्या घराजवळ ठेवलेल्या स्फोटके प्रकरणी एनआयए ने कारवाई करून सचिन वाझे याला अटक केली होती. या अटकेमुळे ठाकरे सरकारवर अनके प्रश्नचिन्ह उपस्थित राहिले होते. तसेच वाझे आणि सेना नेत्यांच्या असलेल्या जुन्या संबंधामुळे शिवसेना अधिक या प्रकरणात खोलात रुतलेली दिसून येत होती.

याच पार्श्वभूमीवर देवेद्र फडणवीस यांनी गृहमंत्री अमित शहा यांची आज सकाळी भेट घेतली होती. तसेच त्यांच्यासोबत महाराष्ट्रातील अनेक बडे भाजपा नेते सुद्धा उपस्थित होते. तसेच या भेटीदरम्यान त्यांनी शिवसेनेच्या दोन नेत्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

या भेटीनंतर अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांची वेगळी बैठक झाली. सचिन वझे प्रकरणात समाविष्ट असलेल्या शिवसेनेच्या दोन नेत्या विरुद्ध केंद्र सरकारच्या माध्यमातून कठोर कारवाई करावी, अशी मागणी देखील फडणवीस यांनी केल्याची सूत्रांची माहिती आहे.

तसेच बुधवारी नवी दिल्ली इथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव घेत सचिन वाझे याच्याबाबत गंभीर आरोप केले आहेत. वसुलीच्या रॅकेटमध्ये सचिन वाझे यांचे नाव आले होते. अशा स्थितीतही मी मुख्यमंत्रिपदी असताना सचिन वाझे यांची पुन्हा नियुक्ती व्हावी यासाठी उद्धव ठाकरे हे माझ्यासोबत बोलले होते असा खळबळजनक खुलासा त्यांनी केला होता.

Team Global News Marathi: