वर्षभरात सर्व टोलनाके हटवणार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेत टोलनाका संदर्भात मोठी घोषणा केली आहे. येत्या वर्षभरात सर्व टोलनाके हटवण्यात येतील अशी घोषणा त्यांनी केली आहे. तसेच टोलच्या जागी गँस (global positioning system) यंत्रणा बसवण्यात येणार आहे अशी माहिती त्यांनी दिलेली आहे.

सध्या सर्व टोलनाके रद्द करण्याच्या योजनेवर सरकार काम करत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. लोक रस्तेप्रवास जितका करतील, तितकाच त्यांना टोल द्यावा लागेल, अशा पद्धतीचे तंत्रज्ञान विकसित करण्याचे काम सुरु असल्याची माहिती गडकरींनी दिली होती.

उत्तर प्रदेशातील अमरोहा मतदारसंघातील बसपा खासदार कुंवर दानिश अली यांनी महापालिकेच्या टोलचा मुद्दा संसदेत उपस्थित केला. त्यावर गडकरींनी उत्तर दिलेले असताना हा टोलचा मुद्धा त्यांनी मांडला होता. तसेच मागील काँग्रेसच्या सरकारकडे बोट दाखवत, टोलनाक्यांद्वारे मलई खाण्यासाठी असे छोटे छोटे टोल उभारण्यात आल्याचे त्यांनी म्हटले.

Team Global News Marathi: