फडणवीसांचे मुंबई पोलिसांवर आरोप हे संपूर्ण महाराष्ट्राची बदनामी करणारे आहेत – अनिल देशमुख

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीवसांनीं मनसुख हिरेन प्रकरणात मुंबई पोलिसांवर लावलेल्या आरोपांचा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी चांगलाच खरपूस समाचार घेतला होता. तत्कालीन भाजपा सरकारच्या काळात स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री पद भूषविले होते.

आज फडणवीसांनी ज्या पोलिसांचे पाच वर्ष गृहमंत्री पदावर विराजमान होऊन स्वतः नेतृत्व केले. ज्यांच्या हाताखाली पोलीस दल काम करत होते. प्रशासन चालविण्यात आणि राज्यातील कायदा सुव्यवस्था राखण्यात पोलिसांनी मदत केली होती. आता मुंबई पोलिसांचे थोबाड काळे झाले अशा प्रकारची भाषा ते कसे वापरू शकतात, असा संतप्त सवाल उपस्थित करत गृहमंत्र्यांनी फडणवीसांनी विचारला आहे.

आज संपूर्ण महाराष्ट्र पोलिसांचे नाव जगभरात जागत आहे. यामागे आम्हा कोणा राजकारण्यांचे नव्हे तर पोलिसांचेच कर्तृत्व आहे. महाराष्ट्र पोलिस दलाला उज्वल परंपरा आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रावर एवढा राग का काढत आहेत, हेच समजत नाही. मुंबई पोलिसांवर आरोप हे संपूर्ण महाराष्ट्राची बदनामी करणारे आहेत, असा दावा गृहमंत्र्यांनी केला होता

Team Global News Marathi: