पाकिस्तानला मिळणार भारताकडून चार कोटी कोरोना लसीचा डोस

करोना संसर्गाशी दोनहात करण्यासाठी पाकिस्तानला ४.५ कोटी करोना लशीचे डोस मिळणार आहे. करोना लशीचे डोस भारतातील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने उत्पादित केल्या आहेत. ‘गावी’च्या माध्यमातून पाकिस्तानला या लशी मिळणार आहेत.

पाकिस्तानचे राष्ट्रीय सचिवांनी दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तानला भारतात बनवण्यात आलेली सिरमने तयार केलेली करोना लस या महिन्यात मिळणार आहे. पाकिस्तानमध्ये याआधी चीनने दिलेल्या करोना लशीने लसीकरण कार्यक्रम सुरू आहे. आतापर्यंत २७.५ दशलक्ष पाकिस्तानी नागरिकांना करोनाची लस टोचण्यात आली असल्याची माहिती सचिवांनी दिली आहे.

पाकिस्तान सरकारने याआधीच यावर्षी एकही लस खरेदी करणार नसल्याचे म्हटले होते. करोनाशी लढण्यासाठी पाकिस्तान हर्ड इम्युनिटी आणि चीन व कोवॅक्सकडून मदत म्हणून मिळणाऱ्या लशीवर अवलंबून असणार आहे. पाकिस्तानची अर्थव्यवस्था संकटात असून मागील काही वर्षांमध्ये कर्जाच्या रक्कमेत वाढ झाली आहे. पाकिस्तानच्या नागरिकांवर दरडोई एक लाख ७५ हजार रुपयांचे कर्ज आहे. यापैकी ४६ टक्के कर्ज हे इम्रान खान सत्तेवर आल्यानंतर वाढले आहे.

Team Global News Marathi: