“फडणवीस हे अत्यंत अहंकारी, लबाड आणि दगलबाज, सत्ता गेल्याने त्यांचे मानसिक संतुलन ढासळलं” – अनिल गोटे

सचिन वाझे तसेच गृहमंत्री देशमुख प्रकरणात विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आघाडी सरकारला अडचणीत आणले आहे. रोज पत्रकात परिषद घेऊन फडणवीस या प्रकरणी नवीन खुलासे करताना आढळून येत आहे. मात्र फडणवीसांचा हा सर्व खटाटोप फक्त मुख्यमंत्री पदासाठी सुरु आहे अशी टीका राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी पत्रक काढून फडणवीसांवर टीका केली आहे.

माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे अत्यंत अहंकारी, लबाड आणि दगलबाज आहेत. सत्ता गेल्यापासून फडणवीस यांचे मानसिक संतुलन ढासळले आहे. फडणवीसांकडे आतापर्यंत केलेल्या एका तरी भ्रष्टाचाराच्या तक्रारीच्या प्रकरणाची चौकशी झाली का? असा गोटे यांनी फडणवीसांना विचारला आहे. अनिल गोटे यांनी याबाबतचे पत्रक देवेंद्र फडणवीसांवर विविध आरोप केले आहेत.
देवेंद्र फडणवीसांच्या आक्रस्ताळेपणाकडे दुर्लक्ष करा. सत्ता हिरावल्यापासून त्यांचे मानसिक संतुलन ढळत चालले आहे. फडणवीस सरकारमधील मंत्री हे चिंचोके गोळा खात होते का? फडणवीस हे अत्यंत अहंकारी, लबाड आणि दगलबाज.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत वाटलेल्या नोटा वर्षावर छापल्या होत्या का? फडणवीसांच्या दरबारातील नवरत्नांच्या यादीवरुन नुसती नजर फिरवली तरी सर्व लक्षात येईल. आपल्याकडे केलेल्या एका तरी भ्रष्टाचाराच्या तक्रारीच्या प्रकरणाची चौकशी झाली का? असा सवाल अनिल गोटे यांनी केला.

देवेंद्र फडणवीसांच्या काळातच गृहखात्याची वाट लागली. मनाला येईल त्याप्रमाणे बदल्या करायच्या. पोलीस यंत्रणेचा वापर करुन विरोधकांनाच नव्हे तर ओबीसी नेत्यांना संपवण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी पोलीस यंत्रणेला कसे वेठीस धरले होते. अशा असंख्य प्रकरणांची माझ्याकडे माहिती आहे, असेही अनिल गोटे यांनी पत्रात म्हटले आहे.

Team Global News Marathi: