“मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतील सर्वांना फडणवीसांनी संपवलं, खासदार विनायक राऊत यांची टीका |

 

मुंबई | शिवसेना नेते आणि खासदार विनायक राऊत यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्री मंडळाच्या मुद्द्यावरून भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. भाजपमध्ये मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत जे जे नेते होते. त्यांना देवेंद्र फडणवीस यांनी राजकीय जीवनातून उद्ध्वस्त करण्याचं काम केलं आहे, असा आरोप विनायक राऊत यांनी केला.

ते म्हणाले की, दिवंगत भाजपाचे नेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या नेत्या प्रीतम मुंडे यांना केंद्रात मंत्रिपद मिळालं नाही. त्यामुळे प्रीतम मुंडे आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे नाराज असल्याच्या चर्चा केंद्रीय मंत्रिमंडळ स्थापन झाल्यानंतर चर्चा सुरू होत्या. त्यावरून आता शिवसेनेने भाजपवर टीका करायला सुरुवात केली आहे.

तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारने पंकजा यांचे पंख छाटले. एकनाथ खडसे यांना बाद केले, असं सांगताना मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत जे जे नेते होते. त्यांना राजकीय जीवनातून उद्ध्वस्त करण्याचं काम देवेंद्र फडणवीसांनी केल्याची टीका शिवसेनेने केली आहे.

OBC आणि मराठवाड्यातील ऊसतोड कामगारांचा आधार, पाठिंबा म्हणून मुंडे परिवाराकडे पाहिलं जातं. दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर पंकजा मुंडे त्याच ताकदीने या वर्गाला न्याय देण्याचे काम करत आहेत. दुर्दैवाने देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने पंकजा यांचे पंख पूर्णपणे छाटून टाकले आहेत. त्याचबरोबर एकनाथराव खडसे यांना बाद करून टाकलं आहे. मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत जे जे होते, त्या सर्वांना फडणवीसांच्या माध्यमातून राजकीय जीवनातून उद्ध्वस्त करण्याचं काम झालं.

Team Global News Marathi: