फडणवीसांच्या भराडी देवी येथे होणाऱ्या जाहीर सभेवर संजय राऊत म्हणतायत की,

 

महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नाहीत. कसबा आणि चिंचवड या दोन्ही जागा आम्ही एकत्रित लढणार असल्याचे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं. आमचा सर्वांचा राजकीय शत्रू एकच आहे. त्यांचा पराभव व्हायला पाहिजे. हे आम्ही विधानपरिषदेच्या निवडणुकीत दाखवून दिल्याचे संजय राऊत म्हणाले. संजय राऊतांनी आज सकाळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी यावर भाष्य केले होते.

विधानपरिषदेच्या निवडणुकीत पाचपैकी चार जागा या महाविकास आघाडीने जिंकल्या आहेत. एक जागा भाजपने जिंकली आहे. अमरावती आणि नागपूर महत्वाच्या जागा महाविकास आघाडीनं जिंकल्या आहेत. या जागा महाविकास आघाडीतील एकीमुळं जिंकल्याचे राऊत म्हणाले. त्यामुळं कसबा आणि चिंचवड दोन्ही जागा महाविकास आघाडी एकत्र लढेल. चिंचवडची जागा शिवसेनेने लढावी अशी आमची भूमिका आहे. तरी आम्ही महाविकास आघाडी म्हणून निर्णय घेऊ असे संजय राऊत म्हणाले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध अशा कोकणतील प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मालवणमधील आंगणेवाडी भराडी देवीची यात्रा आज होत आहे. याच यात्रेचा मुहूर्त साधत भाजप आंगणेवाडीत जाहीर सभा घेणार आहे. भराडी देवीच्या यात्रेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे आंगणेवाडीमधील माळरानावर भाजपने भव्य जाहीर सभा आयोजित केली आहे.

या होणाऱ्या सभेवर संजय राऊत यांना प्रसारमाध्यमांनी प्रश्न विचारला. यावेळी राऊत म्हणाले की, अशा शक्ती प्रदर्शनाने देवी पावत नाही. देवीने आशिर्वाद कायम शिवसेनेवा दिलाय. ती कोकणच्या भुमिवरची देवी आहे. पैसे वाटून देवी पावते का? असा सवालही राऊतांनी उपस्थित केला. शिवसेनेचा जन्म कोकणातून झाला आहे. शिवसेनेचे ताकद कोकण असल्याचे संजय राऊत म्हणाले.

Team Global News Marathi: