“दोन्ही निवडणुका बिनविरोध करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू”; देवेंद्र फडणवीस

 

कसाब विधानसभा मतदार संघाच्या आमदार मुक्त टिळक यांच्या निधनानंतर कसबा पोट निवडणूक जाहीर झाली असून याच पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कसबा पोटनिवडणूक लढवण्यास इच्छुक असलेल्या शैलेश टिळक यांची शुक्रवारी रात्री भेट घेतली.या भेटीत दोघांमध्ये बंद दरवाजा आड चर्चा झाली. फडणवीस यांच्या भेटीनंतर टिळक यांची समजूत घातली की, स्थान पक्के केले, या चर्चांना उधाण आलं आहे.

आमच्या उमेदवारांची दिल्ली कार्यालयातून घोषणा होईल. त्यामुळे सर्वांना आवाहन करणारच आहोत. याआधीही मी केलेलं आहे. यानंतर प्रत्यक्ष जाऊन मी चर्चा ही करणार आहे. त्यामुळे निवडणूक बिनविरोध करण्यासाठी आमचा पूर्ण प्रयत्न असणार असल्याचे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मात्र यावेळी त्यांनी उमेदवाराचे नाव घोषित करणे टाळले होते.

सर्वच क्षेत्रातील व्यक्तींना मनःशांती ची गरज असते. तुम्ही इतके तास काम करत असता त्यामुळे तुम्हालाही मन शांतीची गरज आहे. आपल्या सर्वांनाच मनशांतीची आवश्यकता आहे आणि त्यामुळेच ती घेण्यासाठी मीही आलो होतो. गाणे ऐकल्याने मला शांती मिळते, असंही फडणवीस म्हणाले.

Team Global News Marathi: