‘फडणवीसांचं कामच त्यांना अडचणीत आणतंय’; थोरातांनी लगावला टोला

 

बहुमत चाचणीमध्ये शिंदे-फडणवीस यांच्या सरकारला १६४ मतं मिळाली. तर महाविकास आघाडीला केवळ ९९ मतं मिळाली आणि त्यांचा पराभव झाला. यानंतर सभागृहामध्ये बोलताना काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन केलं.

यानंतर त्यांनी फडवणीसांना टोलाही लगावला. फडणवीसांचं कामच त्यांना अडचणी आणत असल्याचं ते म्हणाले. ‘मी पुन्हा आलो आणि आता बदला घेणार, पण…’, देवेंद्र फडणवीसांची सभागृहात टोलेबाजी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना म्हणायचे की त्यांनी खूप चांगलं काम केलं. मात्र, कदाचित त्यांचं कामच त्यांना अडचणीत आणत आहे.

मी पुन्हा येणार असं ते म्हणायचे, मात्र देवेंद्रजी असे येतील, असं वाटलं नव्हतं, असा टोला बाळासाहेब थोरातांनी लगावला आहे. यासोबतच त्यांनी एकनाथ शिंदे यांचं अभिनंदन करत त्यांचं कौतुकही केलं. एकनाथ शिंदेचा प्रवास अभूतपूर्व आहे. त्यांचा अवाका अतिशय मोठा आहे, असंही ते म्हणाले.

सेनेच्या पुढाकारानेच महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं होतं. आम्ही तर आधीच विरोधी पक्षात बसण्याची तयारी केली होती. मात्र, हे सरकार स्थापन झालं. तीन पक्ष एकत्र काम करतात, तेव्हा थोडा गोंधळ होणं सहाजिक आहे. सरकारने अडीच वर्षात अतिशय चांगल्या प्रकारे सगळं हाताळलं, असंही ते म्हणाले.

Team Global News Marathi: