“फडणवीस मिस्टर इंडिया बनून बाबरीच्या ढाच्यांवर हातोडा मारत होते?”

 

बाबरी आम्हीच पाडली. तुम्ही भोंग्यांनाही घाबरता, अशी टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टीका चेंबूर सोमय्या मैदानात पार पडलेल्या सभेत केली होती. देवेंद्र फडणवीसांच्या या टीकेला शिवसेनेने सामना अग्रलेखातून प्रत्युत्तर दिलं आहे. मी अभिमानानं सांगतो, मी तो बाबरीचा ढाचा पाडण्यासाठी त्याच ठिकाणी होतो. आता फडणवीस असं म्हणतात म्हणजे ते असणारच. पण सीबीआयच्या विशेष न्यायालयातील आरोपपत्रात त्यांचे नाव कुठेच दिसत नाही, असा टोला शिवसेनेने लगावला आहे.

शिवसेनेचे अनेक नेते व शिवसैनिकांची नावं बाबरी प्रकरणाच्या आरोपपत्रात आहेत. त्यामुळे फडणवीस हे ‘मिस्टर इंडिया’ बनून बाबरीच्या ढाच्यांवर हातोडे मारत होते का? याचा गुप्त तपास नव्याने करावा लागेल, अशी खोचक टीका शिवसेनेने सामना अग्रलेखातून केली आहे. तसेच काही संदर्भ सुद्धा सामा अग्रलेखातून देण्यात आले आहे.

दरम्यान, फडणवीस हे उसळलेल्या हिंदू जनसागरातून घुसून बाबरीच्या घुमटावर चढले व हातोडे मारीत राहिले याची नोंद इतिहासात नसावी? हे आश्चर्यच आहे, असा घणाघात सामनातून करण्यात आला आहे. तर बाबरीच्या ढाच्यावरून श्रेयवादाची स्पर्धा इतक्या वर्षांनी करण्यात काय मतलब?, असा सवाल देखील शिवसेनेने उपस्थित केला आहे.

Team Global News Marathi: