‘धर्मवीर’चित्रपटातील आनंद दिघे आणि राज ठाकरे यांच्या कापलेल्या सीनवरुन अमेय खोपकर संतापले

 

शिवसेनेचे मंत्री आणि मंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळे हे बंड झाल्याने त्यांच्या नावाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. अशातच आता मनसेचे चित्रपट सेनेचे अध्यक्ष आणि निर्माते अमेय खोपकर यांनी धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे चित्रपटातील एका सीनवरुन चित्रपटाच्या निर्मात्यांवर जोरदार टिका केली आहे.

 

याबाबतम संपूर्ण माहिती अशी की, एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यापासून धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे चित्रपट चांगलाच चर्चेत आला होता. ठाणे जिल्ह्याचे नेते आनंद दिघे यांच्या जीवनावरील या चित्रपटात एकनाथ शिंदेंचीही व्यक्तिरेखा दाखवण्यात आली होती. चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद पाहायला मिळाला होता.

सदर चित्रपटात राज ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचा संवाद दाखवण्यात आला होता. परंतु आता हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपटाच्या एका सीनवरुन चांगलाच वाद रंगला आहे. ओटीटीवर दाखवण्यात येणाऱ्या चित्रपटात एक संवाद प्रत्यक्षात कट केला असल्याची टिका मनसे नेते आणि चित्रपट निर्माते अमेय खोपकर यांनी केला आहे.

याबद्दलचे ट्विट अमेय खोपकर यांनी केले आहे. ज्यामध्ये त्यांंनी चित्रपटातील राज ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचा संवाद कट केल्याचा आरोप केला आहे. यामध्ये “खालील दोन्ही व्हिडीओ काळजीपूर्वक बघा. धर्मवीर’ जेव्हा zee5 वर येतो तेव्हा राजसाहेबांबद्दलचं वाक्य का गायब होतं? ‘झी’ने शेपूट घालण्याचं कारण काय? ही उद्धव ठाकरेंची सेन्सॉरशिप नाही तर दुसरं काय? राजसाहेबांच्या लोकप्रियतेला टरकणाऱ्या शिवसेनेचा खरा चेहरा उघड झालाय. ‘धर्मवीर’ आनंद दिघे यांचा आवाज दाबणाऱ्या वृत्तीचा कडक शब्दात निषेध,” असे म्हणत जोरदार टिका केली आहे.

Team Global News Marathi: