वडेट्टीवारांकडून देण्यात आलेल्या खात्याबद्दल खदखद व्यक्त, बाळासाहेब थोरातांनी दिलं स्पष्टीकरण

मुंबई | महसूल मंत्रीपद मिळण्याची अपेक्षा होती. पण ओबीसी असल्यानं संधी मिळाली नाही, अशा शब्दांत काँग्रेस नेते आणि मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी नाराजी व्यक्त केली. आता वडेट्टीवार यांनी व्यक्त केलेल्या नाराजीवर काँग्रेस नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी स्पष्टीकरण देत काँग्रेस पक्षाची बाजू मांडली आहे.

 

‘काँग्रेस जातीयवादी पक्ष नाही, धर्मवादी तर अजिबातच नाही. आम्ही धर्मनिरपेक्ष आहोत. त्यामुळे असं काही होण्याचा प्रश्नच नाही. वडेट्टीवार यांचं वय त्यांच्या बाजूनं आहे. त्यांच्या हातात असलेलं वय पाहता भविष्यात त्यांना खूप मोठी संधी मिळणार आहे. त्यासाठी त्यांना थोडी वाट पाहावी लागेल. आगामी काळात त्यांना मोठी जबाबदारी मिळेल,’

काय म्हणाले होते मंत्री विजय वडेट्टीवार
शिबिरात बोलताना विजय वडेट्टीवार यांनी त्यांची खदखद व्यक्त केली. ओबीसींचं राजकीय आरक्षण टिकवण्याची गरज यावेळी त्यांनी बोलून दाखवली. आज लढलो नाही तर भविष्यात नोकरी आणि शिक्षणातील आरक्षण जाण्याची भीती त्यांनी व्यक्त केली. आपली ताकद फार मोठी आहे आणि ती आपण ओळखली पाहिजे, असं वडेट्टीवार म्हणाले.

Team Global News Marathi: