“राहूल गांधी खोट बोलून अफवा पसरवितात, लोकांचे आयुष्य धोक्यात टाकताहेत”

खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली असून, त्यानंतरच मन की बात करा, असं म्हटले होते. आता त्यांच्या या टीकेला मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी प्रतिउत्तर दिले आहे. राहूल गांधी खोटं बोलून अफवा पसरवतात, लोकांचं आयुष्य धोक्यात टाकताहेत अशी टीकाचौहान यांनी केली आहे.

फक्त प्रत्येक देशवासीयांपर्यंत लस पोहोचवा, मग हवे असल्यास मन की बात पण सांगा, असे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे. यावर चौहान यांनी यांनी राहुल गांधींना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. राहुल गांध हे गैरसमज आणि अफवा पसरवण्याचं करत आहेत. कोरोना लसीकरणाबाबत ते करत असलेली विधानं हा देशातील कोट्यवधी नागरिकांच्या जिवाशी खेळ आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

लसीकरण मोहीमेचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल आढावा बैठक घेतली होती. या बैठकीला कोरोना टास्क फोर्सचे अधिकारी व पीएमओ उपस्थित होते. पंतप्रधानांनी आतापर्यंतच्या लसींची उपलब्धता आणि येत्या काही महिन्यांत राज्यांना लसींचा पुरवठा यासह अनेक माहिती घेतली. लसीची संपूर्ण व्यवस्था हातात घेतल्यानंतर केंद्र सरकारला लसीकरणाचा वेग वाढवायचा आहे. सरकारला यावर्षी डिसेंबरपर्यंत देशातील संपूर्ण लोकांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करायचे आहे.

Team Global News Marathi: