अर्थजगत:एफडी वगैरे सोडा, ‘ह्या’ बॅंकेच्या शेअरने १ लाखाचे केले १० कोटी

एफडी वगैरे सोडा, ‘ह्या’ बॅंकेच्या शेअरने १ लाखाचे केले १० कोटी

 

ग्लोबल न्यूज नेटवर्क :- संयम हा एक महत्त्वाचा घटक आहे जो दीर्घ कालावधीत शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना उत्तम परतावा देतो. शेअर बाजारातील तज्ज्ञांच्या मते, एखाद्याने दर्जेदार स्टॉक दीर्घकाळ ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे.(Share Market)

‘स्टॉक खरेदी करा आणि ते विसरून जा’ ही एक रणनीती आहे, ज्याचा अवलंब करून तुम्ही हजारो रुपयांचे रुपांतर कोट्यावधी रुपयांमध्ये करू शकता.

हे गुंतवणूकदाराला त्याच्या गुंतवणूकीवर चक्रवाढ उत्पन्नाचा लाभ घेण्यास मदत करते. आम्ही तुम्हाला आज अशाच एका शेअरबद्दल माहिती देऊ, ज्याने १ लाख रुपयांचे रूपांतर १० कोटींमध्ये केले आहे.

 

तो शेअर आहे कोटक महिंद्रा बॅंकेचा. कोटक महिंद्रा ही देशातील आघाडीची बॅंक आहे. सध्या कोटक महिंद्रा बॅंकेचा शेअर १,९३९.०० रुपये प्रति शेअरच्या किंमतीवर आहे.

एरवी बॅंक म्हटले की आपल्याला मुदतठेव किंवा एफडीमध्ये केलेली गुंतवणूक आठवते. मात्र ज्या गुंतवणुकदारांनी या बॅंकेत एफडी करण्याऐवजी बॅंकेच्या शेअरमध्ये गुंतवणूक केली असेल ते अक्षरश: कोट्यधीश झाले आहेत.

 

शेअरने दिला १००० पट नफा, गुंतवणुकदार झाले करोडपती

मागील फक्त एका महिन्यातच कोटक महिंद्रा बॅंकेचा शेअर १,८१५ रुपयांच्या पातळीवरून १,९३९ रुपयांवर पोचला आहे. तीन महिन्यांपूर्वी हा शेअर १,७२० रुपयांच्या किंमतीवर होता. तीन महिन्यात यात १५ टक्क्यांची वाढ झाली आहे. मागील काही महिन्यात या शेअरवर विक्रीचा दबाव होता.

 

मागील ५ वर्षांचा विचार करता या शेअरने १५० टक्क्यांचा परतावा दिला आहे. हा शेअर ७८१ रुपयांच्या पातळीवरून सध्याच्या १,९३९ रुपयांच्या पातळीवर पोचला आहे. १० वर्षांमध्ये तर या शेअरने ७५० टक्के परतावा दिला आहे. दहा वर्षापूर्वी कोटक महिंद्राच्या शेअरची किंमत २३२ रुपये होती.

 

मात्र या शेअरने खरी जादू केली आहे. २० वर्षांच्या कालावधीत या शेअरची किंमत १.९४ रुपये प्रति शेअरवरून १,९३९ रुपयांपर्यत वाढली आहे. ही वाढ छप्परफाड आहे. म्हणजेच २००१ मध्ये या शेअरमध्ये गुंतवणूक करणारे आज कोट्यधीश झाले आहेत.

१ लाखाचे झाले १० कोटी

कोटक महिंद्राच्या शेअरची किंमत २००१ मध्ये १.९४ रुपये प्रति शेअर होती. तर आज या शेअरची किंमत १,९३९.० रुपये प्रति शेअर इतकी आहे. या शेअरच्या किंमत २० वर्षांच्या कालावधीत जवळपास १००० पट वाढ झाली आहे. २० वर्षांत या शेअरने गुंतवणुकदारांना जवळपास ९९८४५ टक्के परतावा दिला आहे.

एवढ्या जबरदस्त परताव्याचा विचार गुंतवणुकदारांनी स्वप्नातदेखील केला नसेल. २० वर्षांपूर्वी या शेअरमध्ये गुंतवलेल्या १ लाख रुपयांचे मूल्य आज जवळपास १० कोटी रुपये झाले आहे. ही वाढ कल्पनेपलीकडची आहे. या मल्टीबॅगर शेअरने सर्वसामान्य गुंतवणुकदारांना छोट्याशा गुंतवणुकीद्वारे श्रीमंत बनवले आहे.

मुंबई शेअर बाजाराचा निर्देंशाक असलेला सेन्सेक्स ६१,००० अंशांच्या पातळीच्या पुढे पोचला आहे. सध्या शेअर बाजाराचे दोन्ही निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी विक्रमी पातळीवर पोचले असून त्यामुळे अनेक कंपन्यांच्या शेअरच्या किंमती वाढल्या आहेत. शेअर बाजारातील ही तेजी अभूतपूर्व आहे. चढ आणि उतार हे शेअर बाजाराचे अविभाज्य घटक आहेत.  या तेजीवर आरुढ होताना गुंतवणुकदारांनी सतर्क राहण्याचीही आवश्यकता आहे. शेअर बाजारात कायम तेजीच राहील आणि त्यातून आपण फक्त नफाच कमावू अशी अपेक्षा बाळगणे जोखमीचे आणि चुकीचे ठरेल.

(डिस्क्लेमर : आर्थिक साक्षरता वाढवणे हाच आमचा उद्देश आहे. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखीमयुक्त असते. आम्ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सुचवत नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या आर्थिक सल्लागाराच्या मार्गदर्शनाखाली योग्य तो निर्णय घ्यावा.)

ग्लोबल न्युज नेटवर्क: