सर्वसामान्यांना नाईट लाईफ नको, नाईट लाईफ हवी असणारे तुमच्यासोबत चंद्रकांत पाटलांनीं लगावला मुख्यमंत्र्यांना टोला

राज्यात कोरोना रुग्णाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने “रात्र संचारबंदी” लागू केली आहे. सरकारच्या या आदेशानुसार राज्यात रात्री ८ ते सकाळी ७ पर्यंत जमावबंदीचा आदेश असणार आहे. ही संचारबंदी पुढच्या १५ एप्रिलपर्यंत लागू राहणार आहे. यावरूनच आता भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आघाडी सरकारला टोला लगावला आहे.

कोरोनाच्या वाढत्या प्रमाणावर लॉकडाऊन हे उत्तर नाही. काळजी घेऊन लोकांनी नित्याचे व्यवहार केले पाहिजेत. नाईट कर्फ्यू लावायला आम्ही नकार देत नाही. नाईट लाईफ लोकांची नसते, ती तुमची असते. ज्यांना नाईट लाईफ हवी आहे. ते तुमच्यासोबत आहेत, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला.

कोरोनाच्या वाढत्या प्रमाणात ल़ॉकडाऊन हे उत्तर नाही. आता जर लॉकडाऊन केलं तर तुम्ही एक रुपयाचं पॅकेज देणार नाही. वर्षभर लोक कसे जगले, ते तुम्हाला मातोश्रीत बसून कळणार नाही. त्यासाठी ठिकठिकाणी फिरावे लागेल असा टोला मुख्यमंत्र्यांना लगावला होता.

Team Global News Marathi: