शरद पवारांना बरे होण्यासाठी मान्यवर नेत्यांच्या शुभेच्छा..ठाकरे बंधुसह केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी केली विचारपूस

मुंबई – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. रविवारी संध्याकाळी त्यांच्या पोटात दुखल्यामुळे थोडासा अस्वस्थपणा जाणवत होता, म्हणूनच तपासणीसाठी त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात नेण्यात आले. निदान झाल्यानंतर, त्यांच्या पित्ताशयामध्ये एक समस्या असल्याचे निदर्शनास आल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी दिली.

Mumbai: NCP Chief Sharad Pawar addressing the media at a press conference in Thane on Monday. PTI Photo (PTI3_7_2017_000011B)

तर, दुसरीकडे खासदार सुप्रिया सुळे यांनीही व्हॉट्सअप स्टेटसद्वारे वडिल शरद पवारा यांचे पुढील 15 दिवसांचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचे सांगितले. त्यानंतर, देशभरातून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस होत असून त्यांच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करण्यात येत आहे.

राजकीय नेत्यांकडूनही शरद पवार यांच्या प्रकृतीसंदर्भात संबंधितांना विचारण्यात येत आहे. तर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही शरद पवार यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. मुख्यमंत्र्यांच्या सदिच्छा या महाराष्ट्राच्या प्रातिनिधिक भावना आहेत, त्यांचे मनपूर्वक आभार! असे पवार यांनी म्हटले. तसेच, भारतरत्न लता मंगेशकर, आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनीही शरद पवार यांना फोन करुन त्यांची आस्थेनं विचारपूस केली.
याशिवाय भाजप नेने देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ आदींनी ही ट्विट करता पवारांना बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

ग्लोबल न्युज नेटवर्क: