मोहन भागवत यांचे भाषण खोटं आणि अर्धसत्य, खासदार ओवैसी यांची टीका

 

नवी दिल्ली | सरसंघचालक मोहन भागवत यांनी विजयादशमीदिनी केलेले भाषण खोटे आणि अर्धसत्य आहे अशी टीका खासदार असादुद्दीन ओवैसी यांनी केली आहे. तसेच देशात मुस्लिमाची लोकसंख्या वाढत नसून त्यांचा जन्मदर घटला आहे असे ओवैसी म्हटले आहेत. जम्मू कश्मीरमध्ये कलम ३७० हटवल्यानंतर बेरोजगारी वाढली असेही ओवैसी म्हणाले. ओवेसी यांनी ट्विट करून टीका केली आहे.

ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की देशात मुस्लिम आणि ख्रिश्चन समाजाची लोकसंख्या वाढली असे भागवत यांनी म्हटले परंतु देशात मुस्लिमाचा जन्मदर घटला आहे. देशात बालविवाह आणि स्त्रीभृण हत्येचे प्रमाण वाढले आहे. बालविवाहात ८४ टक्के बालक हिंदू आहेत. २००१ ते २०११ दरम्यान मुस्लिम लिंग गुणोत्तर प्रमाण हे ९३६ वरून ३५१ वर गेले आहे. तर हिंदु समजातात एक हजार पुरुषांमगील स्त्रियांचे लिंग गुणोत्तर प्रमाण ९३१ वरून ९३९ पर्यंत वाढले आहे असे ओवैसी म्हणाले.

हिंदुस्थानात मोठ्या प्रमाणात युवक बेरोजगार आहेत, त्यात पंतप्रधान फक्त भजी विकण्याचे वचन देत आहेत. जम्मू कश्मीरमध्ये कलम ३७० मुळे बेरोजगारी दर २१.०६ टक्क्यांवर पोहोचल्याचेही ओवैसी यांनी सांगितले आहे.

 

Team Global News Marathi: