पंढरपूर : पंढरपूर-मंगळवेढा पोट निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील वातावरण चांगलेच तापू लागले आहे. त्यात सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांवर आरोप आणि प्रत्यारोपाच्या फेऱ्या झाडायला सुरवात केली आहे.
त्यातच आता भाजपचे नेते आणि माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर घणाघाती टीका केली असून रेणू शर्मा प्रकरणावरून मुंडेंवेळ जोरदार टीका केली आहे. ते भाजपा उमेदवार समाधान अवताडे यांच्या प्रचारासाठी पंढरपूर सभेत बोलत होते.
ते जाहीर सभेत म्हणाले की, माय बहीण करवली म्हणून आली. धनंजय मुंडे म्हणाले, वहिनी तुम्ही आलात म्हणजे ताटात सांडलं काय आणि वाटीत सांडलं काय सारखच. दोघी बहिणी बहिणी एकत्र राहावा. मग एकदा वीज कनेक्शन घेतलं की मीटर पडणारच. मीटर पडलं. दोन पोरं झाली. त्या दोन पोरांना आपलं नाव दिलं. त्यांना विचारलं अरे तू नाव कसं देतोस? तेव्हा ते म्हणाले, मला अजिबात भीती वाटत नाही. महाराष्ट्रातील माझा लाडका नेता पुरोगामी आहे. असे नवीन विषय पुरोगामीत्वाचे स्वीकारले पाहिजे. असं सांगतानाच भाद्रपद महिन्यातल्या कुत्र्याला देखील लाज वाटते. पण धनंजय मुंडेंना लाज वाटली नाही अशी घणाघाती टीका ढोबळे यांनी केली.