राज्यात मराठा आणि OBC आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकारण तापलेले असताना आता महाविकास आघाडी सरकारमधील एका बड्या नेत्याने OBC आरक्षणाच्या मुद्द्यावरून आपल्याच पक्षाला घरचा आहेर दिला आहे. सत्ताधारी आणि विरोधकांची सत्ता असली तरी या सत्तेत OBC च स्थान काय असा प्रश्न काँग्रेस नेते आणि मदत आणि पुर्नवसन मंत्री विजय वड्डेटीवार यांनी उपस्थित केला होता.
‘सत्ता आली तर तुम्ही आम्ही कोण तर कप-बशा धुणारे! चहा पिणारे नाही. त्यांनी खावा मटनाचा रस्सा आणि तुम्हाला भजा! आपण भजांवर खुश. अरे तो मटन खातोय आणि तुम्ही भजांवर खुश. तुम्ही आम्ही कुठे आहोत याचा विचारच आपण करत नाही. ज्या दिवशी तुम्ही दुसऱ्याच्या ताटातील काढायला शिकाल, त्या दिवशी खऱ्या अर्थाने ओबीसी हा मजबुतीने उभा झालाय हे चित्र रंगेल, ती ताकद तुम्हा आम्हाला सर्वांना मिळून निर्माण करायची आहे.’ असंहि वडेट्टीवार म्हणाले.
ओबीसी समाजासाठी भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे रोज लढताना दिसतात. ते माझं कौतुक देखील करताना दिसतात. मी देखील त्यांचं कौतुक केलं पाहिजे. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर आपण मिळून लढू. नाहीतर काय शिवसेना सत्तेत आली तर पहिले मुख्यमंत्री कोण आणि भाजप सत्तेत आली तर पहिले मुख्यमंत्री कोण हे सर्वांनाच माहिती आहे. सत्ता आल्यानंतर पहिल्या बाकावर कोण बसणार हे सर्वांना मााहिती आहे. तेव्हा तुम्ही कुठे आहात?, असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे.