नारायण राणेंना पंतप्रधान केले, तरी शिवसेनेला दु:ख वाटण्याचे कारण नाही’ – विनायक राऊत

 

मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्री मंडळात शिवसेना पक्षाचे कट्टर शत्रून भाजपा नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना मात्र मंडळात स्थान देण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेला मुंबई मनगर पालिका निवडणुकीत अडचणीत आणण्यासाठी राणेँना शह देण्यात आला आहे अशी चर्चा राजकीय वर्तुळात होताना दिसत आहे.

याच पार्श्वभूमीवर आता शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी भाष्य केले आहे. ‘नारायण राणे यांचा शिवसेनेकडे आणि विशेषत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन आजही बदललेला नाही आणि याच गोष्टीचे दुःख वाटते, असे म्हणतानाच नारायण राणे यांना भाजपने सूक्ष्म उद्योग मंत्री करावे, अती वरिष्ठ मंत्री करावे किंवा थेट पंतप्रधान करावे, याचे शिवसेनेला दुःख वाटण्याचे कारण नाही, असं विनायक राऊत यांनी म्हटलं आहे.

पुढे बोलताना राऊत म्हणाले की, ‘भाजपाला नारायण राणे यांना केंद्रात मंत्रिपद द्यायचे होते, ते त्यांनी दिले आहे.
आता तिथे सुखाने रहावे. त्या खुर्चीवर बसून पूर्वीच्या स्वभावाप्रमाणे कोणाला दुखवू नका, असा टोला देखील विनायक राऊत यांनी नारायण राणे यांना लगावला आहे. राणे यांनी मंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत भाष्य केले होते.

Team Global News Marathi: